GT vs DC: ‘हा' ठरला गुजरात टायटन्स संघाच्या विजयाचा टर्निंग पॉईंट!
आयपीएल 2025 स्पर्धेत शुबमन गिल आणि साई सुदर्शनच्या जोडीचं धमाकेदार प्रदर्शन पाहायला मिळालं आहे. ही अशी एकमेव जोडी आहे जी फोडण्यासाठी गोलंदाजांना घाम फुटतो. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यातही या जोडीचा बोलबाला पाहायला मिळाला. दिल्लीने गुजरात टायटन्ससमोर विजयासाठी 200 धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना साई सुदर्शनने शानदार शतकी खेळी करून गुजरातला विजय मिळवून दिला.
गुजरात टायटन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी 200 धावांची गरज होती. प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्वाचा होता. पण गुजरातसाठी कर्णधार शुबमन गिल आणि साई सुदर्शन या दोघांची फलंदाजी पाहून दबाव असल्याचं मुळीच दिसून आलं नाही. दोघांनी दिल्लीच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.
दिल्लीने पहिल्या डावात फलंदाजी करताना 119 धावा केल्या होत्या. गुजरातला हा सामना जिंकण्यासाठी 200 धावा करायच्या होत्या. पण गुजरातसाठी शुबमन आणि साई सुदर्शनने मिळून 200 धावांची भागीदारी केली. साई सुदर्शनने 61 चेंडूत 108 धावांची शतकी पारी खेळली. यादरम्यान त्याने 12 चौकार तसेच 4 षटकार झळकावले. याच सोबत गिलने सुद्धा 53 चेंडूत 93 धावा केल्या. त्याने 7 षटकार तसेच 3 चौकार झळकावले. यापूर्वी आयपीएलच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं. गुजरातच्या सलामी जोडीने एकही विकेट न गमावता 200 धावांचा यशस्वी पाठलाग केला.
या सामन्यात दिल्लीचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी मैदानात आला. दिल्लीकडून केएल राहुलची बॅट चांगलीच तळपली. त्याने 65 चेंडूंत 112 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 4 षटकार आणि 14 चौकार मारले. तर अभिषेक पोरेलने 30 धावा केल्या. शेवटी अक्षर पटेलने 25 आणि ट्रिस्टन स्टब्सने 21 धावा करत संघाची धावसंख्या 119 वर पोहोचवली.
Comments are closed.