जे.जे.मध्ये एमबीबीएसच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

सर जे.जे. रुग्णालयातील वसतीगृहात एमबीबीएसच्या तिसऱया वर्षाला शिकणाऱया रोहन प्रजापती या विद्यार्थ्याने रविवारी रात्री वसतीगृहातील आपल्या मित्राच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. रोहन याने कौटुंबिक कारणास्तव आत्महत्या केल्याचे सांगितले जाते. जे.जे. रुग्णालयाच्या आवारात असलेल्या अपना हॉस्टेलमध्ये ही घटना घडली. रोहन हा घाटकोपरला राहत होता. तिथून तो रुग्णालयात येत असे. रविवारी रात्री त्याने आपल्या एका मित्राला फोन करून वसतीगृहातील त्याच्या खोलीमध्ये कुणी आहे का असे विचारले. आपल्याला अभ्यास करायला यायचे आहे असे कारण त्याने सांगितले. सुट्टीचा काळ असल्याने खोलीतील अन्य विद्यार्थी गावी गेले होते. त्यामुळे मित्राने रोहनला यायला सांगितले. चावी देऊन मित्र कामाला निघून गेला. 198 क्रमांकाच्या त्या खोलीत रोहनने आतून कडी लावून घेत गळफास घेतला.

Comments are closed.