टीम इंडियाला मोठा धक्का ‘हा' स्टार फलंदाज जखमी, जाणून घ्या किती महिने राहणार मैदानाबाहेर!

भारतीय संघासाठी टी 20 कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar yadav) आयपीएल 2025 मध्ये शानदार फलंदाजी केली. त्याने मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) खूप शानदार कामगिरी केली. तसेच या हंगामात मुंबईसाठी सर्वात जास्त धावा करणारा तो खेळाडू ठरला. आता सूर्यकुमार यादवच्या अडचणीत वाढ झालेली आहे, त्याला खूप गंभीर दुखापत झाली आहे. ज्यामुळे तो मोठ्या काळासाठी क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहू शकतो.

सूर्यकुमार यादवला एका विशिष्ट प्रकारच्या पोटाच्या दुखापतीसाठी (स्पोर्ट्स हर्निया) शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. तो यासाठी इंग्लंडला देखील गेलेला आहे, त्याच्यावर शस्त्रक्रिया इंग्लंडमध्ये होणार आहे. सध्या तो क्रिकेटपासून दूर आहे. सूर्या मैदानात ऑगस्टमध्ये परतण्याची शक्यता आहे. सूर्याने मुंबई टी 20 लीगमध्ये भाग घेतला होता, पण त्यांचा संघ लीग स्टेज मधूनच बाहेर झाला.

सूर्यकुमार यादवने आयपीएल 2025 (IPL 2025) मध्ये मुंबईसाठी शानदार फलंदाजी करत 16 सामन्यांमध्ये 717 धावा केल्या होत्या. याशिवाय त्याने 5 अर्धशतक सुद्धा झळकावले आहेत. त्याची सर्वोत्तम खेळी 73 धावांची राहिली होती.

भारतीय संघ सध्या इंग्लंडविरुद्ध 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. यानंतर टीम इंडियाला (Team india) 3 वनडे आणि 3 टी20 सामने खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा करायचा आहे. पहिला टी20 सामना 26 ऑगस्ट रोजी खेळला जाणार आहे. असे मानले जात आहे की, सूर्या या मालिकेच्या निमित्ताने मैदानावर पुनरागमन करू शकतो.

Comments are closed.