शेअर बाजारातील 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना लाभांश देणार; शेअर्सने 5 वर्षात 900% परतावा दिला

Share Market News: शेअर मार्केटमधील गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पाच वर्षांत 900% परतावा देणाऱ्या कंपनीने तिच्या भागधारकांना लाभांश जाहीर केला आहे. लाभांश देणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी ही निश्चितच एक उत्तम संधी असणार आहे.
खरं तर, सध्या शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्या त्यांचे सप्टेंबर तिमाही निकाल जाहीर करत आहेत. यासोबतच गुंतवणूकदारांसाठी बोनस शेअर्स, डिव्हिडंड यासारखे कॉर्पोरेट फायदेही जाहीर केले जात आहेत. शेअर इंडिया सिक्युरिटीजनेही आपल्या भागधारकांसाठी लाभांश जाहीर केला आहे.
कंपनीने आपले तिमाही निकाल जाहीर करताना ही घोषणा केली आणि यामुळे कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शेअर इंडिया सिक्युरिटीजने जुलै-सप्टेंबर तिमाहीचे निकाल 30 ऑक्टोबर 2025 रोजी जाहीर केले आहेत, दुसरा अंतरिम लाभांश आणि नवीन कंपनीमधील स्टेक बायबॅक.
लाभांश किती असेल?
कंपनीच्या संचालक मंडळाने 30 ऑक्टोबर रोजी स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, कंपनी आपल्या भागधारकांना 0.40 रुपयांचा लाभांश देणार आहे. अर्थात, प्रत्येक पात्र भागधारकाला कंपनीकडून प्रति शेअर 0.40 रुपये लाभांश मिळेल.
रेकॉर्ड तारखेपर्यंत कंपनीचे शेअर्स धारण करणाऱ्या भागधारकांना याचा लाभ मिळेल. परंतु कंपनीने अद्याप लाभांशाची रेकॉर्ड डेट निश्चित केलेली नाही. मात्र, कंपनीचे संचालक मंडळ याबाबत लवकरच निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे.
कंपनीने शेअर इंडिया ग्रेहिल प्रायव्हेट लिमिटेड नावाची नवीन उपकंपनी स्थापन करण्याची आणि त्यात 6 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणाही केली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कंपनी एक किंवा अधिक हप्त्यांमध्ये गुंतवणूक करेल.
दरम्यान, कंपनीच्या संचालक मंडळाने केलेल्या या घोषणेनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये 0.76 टक्क्यांनी वाढ झाली आहे. काल हा शेअर 199.60 रुपयांच्या रेंजमध्ये ट्रेडिंग करत होता. पण आज त्याची किंमत 186 रुपयांपर्यंत घसरली आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 912% परतावा दिला आहे.
पण गेल्या एका वर्षात कंपनीचे शेअर्स 31 टक्क्यांनी घसरले आहेत. या वर्षी आतापर्यंत त्यात 33 टक्क्यांनी घसरण झाली आहे. मात्र गेल्या 30 दिवसांत कंपनीचा स्टॉक 55 टक्क्यांनी वाढला आहे.
Comments are closed.