“बुमराहला संघात घ्यायलाच नको होतं…” माजी क्रिकेटपटूच्या वक्तव्याने उडाली खळबळ
Manoj Tiwary Statement on Jasprit Bumrah: भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी सध्या सतत चर्चेत आहे. त्याने यापूर्वी महेंद्रसिंग धोनीवर पाठिंबा न दिल्याचा आरोप केला होता, तर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासाठी ‘ढोंगी’ असा शब्द वापरला होता. आता त्याने भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला लक्ष्य केले आहे. (Manoj Tiwary on Jasprit Bumrah)
बुमराह इंग्लंड दौऱ्यावर 5 पैकी फक्त 3 कसोटी सामने खेळला होता. यावर मनोज तिवारी म्हणाला की, “माझ्या मते, जेव्हा तुम्हाला आधीच माहित आहे की एखादा खेळाडू मालिकेतील सर्व 5 सामने खेळण्यासाठी तंदुरुस्त नाही, तर तुम्ही त्याची निवड करू नये. तुम्ही त्या खेळाडूची निवड करणार नाही, कारण कोणताही खेळाडू क्रिकेटच्या खेळापेक्षा मोठा नाही. तो जसप्रीत बुमराह असो, विराट कोहली, रोहित शर्मा किंवा इतर कोणीही. क्रिकेटच्या खेळापेक्षा कोणीही मोठा नाही.” (Manoj Tiwary controversial statements)
मनोज तिवारी पुढे म्हणाला की, जर टीम मॅनेजमेंट किंवा निवड समितीला माहित असेल की एखादा विशिष्ट खेळाडू सर्व सामने खेळू शकत नाही, तर त्याची निवडच केली जाऊ नये. “एक कारण समजू शकतो की, जर वेगवान गोलंदाजीमध्ये चांगला बॅकअप नसेल तर बुमराहची निवड करणे आवश्यक होते, पण जेव्हा तुमच्याकडे बेंचवर असे गोलंदाज आहेत, जे सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत, अशा परिस्थितीत बुमराहची निवडच करायला नको होती.” (Manoj Tiwary controversial statements)
हे लक्षात घ्यायला हवे की, बुमराहने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील सर्व 5 कसोटी सामने खेळले होते. मात्र, सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात त्याला कमरेला दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे तो चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) मध्ये खेळू शकला नाही. कदाचित याच कारणामुळे संघ व्यवस्थापनाला बुमराहने इंग्लंडमध्ये फक्त 3 कसोटी सामने खेळावेत, असा निर्णय घ्यावा लागला असेल. (Jasprit Bumrah fitness controversy)
Comments are closed.