This is the success of the unity of Murtikars, what did Ashish Shelar say on bombay high court decision on lifting ban over pop idols in marathi


Ganeshotsav 2025 : मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवरील निर्बंध हटवण्याचा निर्ण मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी घेतला. या निर्णयामुळे मूर्तीकार तसेच गणेशोत्सव मंडळांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. न्यायालयाच्या या निर्णयावरून माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी सर्व मूर्तीकरांचे अभिनंदन केले आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. आमच्या सर्व मूर्तीकारांनी जी एकजूट दाखवली. आपला सण, प्रथा परंपरा, पारंपारिक उत्सव, आपल्या गणेशाची वंदना, गणेशपूजन, गणेशोत्सव आणि हिंदुत्व टिकवण्यासाठी, रोजगार टिकवण्यासाठी एक मोठा संघर्ष या मंडळींनी केल्याचे त्यांनी म्हटले आहे. (this is the success of the unity of Murtikars, what did Ashish Shelar say on bombay high court decision on lifting ban over pop idols)

शेलार म्हणतात, एक गणेशभक्त म्हणून मी गेली कित्येक वर्ष या गणेशभक्तांच्या, मूर्तीकारांच्या, कारखानदारांच्या आणि गणेशोत्सव मंडळांच्या बाजूने संपूर्ण मुंबईत कार्यरत आहे. म्हणून या कायद्यात प्रतिकूल वाटणाऱ्या परिस्थितीत कायदेशीर मार्ग काढत आम्ही जे प्रयत्न केले, त्याची परिणती पीओपीच्या मूर्ती बनवण्यावरील बंदी उठवण्यावर झाला आहे. पीओपीच्या मूर्तीचं प्रदर्शन करण्यावर बंदी नाही, पीओपीच्या गणेशमूर्ती विकण्यावर आता बंदी नाही, पीओपीच्या गणेशमूर्ती विसर्जन करण्यावर बंदी नाही पण त्या विसर्जनाची व्यवस्था सरकारने करणं अपेक्षित असल्याचे शेलार म्हणाले.

हेही वाचा – PoP Ganesh Idols : राज्यातील गणेश मूर्तीकारांना दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाने घेतला मोठा निर्णय

छोट्या मूर्तींची व्यवस्था मुंबई आणि अन्य शहरात होतातच, त्यामुळे तो ही प्रश्न आता राहणार नाही. मोठी गणेशोत्सव मंडळे आणि मोठ्या मूर्ती त्यांची व्यवस्था राज्य सरकारला करण्याबाबतीत धोरण राज्य सरकारला न्यायालयासमोर मांडावे लागणार आहे. नैसर्गिक जलस्रोत प्रदूषित होऊ नये ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. काकोडकर आयोगाने समुद्रात विसर्जन करू शकतो असा जो निष्कर्ष दिलाय तो मुद्दा घेऊन आम्ही आता पुढची लढाई लढू. आयोगाच्या म्हणण्यानुसार राज्य सरकारकडे विनंती करून, आवश्यकता वाटली तर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे जाऊन आवश्यकता असेल तर न्यायालयाकडे जाऊन मोठ्या गणेशोत्सवांचा मार्ग मोकळा करू. आज आमच्या गणेश मूर्तिकारांच्या रोजगाराचा 60- 70 टक्के प्रश्न संपल्याचा आम्हाला आनंद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने पीओपी गणेश मूर्ती बनवण्यावरील तसेच त्यांच्या विक्रीवरील निर्बंध हटवले असले तरी या मूर्तींच्या विसर्जनाबाबत एक अट ठेवली आहे. या मूर्तींचे विसर्जन केवळ कृत्रिम तलावांमध्येच करता येईल. मात्र, नैसर्गिक तलावात त्यांचे विसर्जन करता येणार नाही. सर्वपक्षीयांनी न्यायालयाचा हा निर्णय मान्य केला आहे.



Source link

Comments are closed.