‘यात काहीच शंका नाही’, जयस्वाल नाही, तर हा खेळाडू आहे भारतीय क्रिकेटचा नवा सुपरस्टार, रवी शास्त्रीचं वक्तव्य
भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी त्या खेळाडूबद्दल बोलताना सांगितले, ज्याला ते भारतीय क्रिकेटचा उगवता तारा मानतात. माजी कोच शास्त्री यांनी स्काय स्पोर्ट्सवरील चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना या खेळाडूचा उल्लेख केला. शास्त्री यांनी यशस्वी जयस्वाल नव्हे, तर शुबमन गिल (Shubman gill) यांना भारतीय क्रिकेटचा उगवता स्टार ठरवले.
गिलबद्दल बोलताना शास्त्री म्हणाले, यात काहीच शंका नाही की शुबमन गिल दीर्घकाळ टीममध्ये टिकेल, कारण आपण पाहिले आहे की त्याने इंग्लंडविरुद्ध किती अप्रतिम मालिका खेळली.
पुढे बोलताना शास्त्री म्हणाले, माझ्या मते तो फक्त 25 वर्षांचा आहे आणि या अनुभवासह तो आणखी चांगला होत जाईल. तो अगदी टॉपवर आहे आणि राहील. तो शांत स्वभावाचा आहे, त्याच्यात एक प्रकारचा राजेशाहीपणा आहे. जेव्हा तुम्ही त्याच्याकडे पाहता तेव्हा हे जाणवतं. त्याची फलंदाजी बघायला अतिशय सहज आहे आणि त्याच्यात मोठी खेळी करण्याची क्षमता आहे.
अलीकडेच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शुबमन गिलने शानदार फलंदाजी केली. 5 कसोटीत त्याने एकूण 754 धावा केल्या, ज्यात एक द्विशतक आणि तीन शतके होती. आत्तापर्यंत गिलने 37 कसोटी सामने खेळून 2647 धावा केल्या आहेत, ज्यात 9 शतके आणि एक द्विशतक आहे.
एकदिवसीय सामन्यांत गिलने 55 सामने खेळले असून 2775 धावा केल्या आहेत. यात त्याने 8 शतके आणि 50 अर्धशतके झळकावली आहेत. आता आशिया कप (Asia Cup) सप्टेंबरमध्ये सुरू होत आहे. त्यामुळे टी-20 स्वरूपातील आशिया कपमध्ये गिलचा समावेश होईल का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. तसेच शुबमन गिलला आता टी-20 संघाचा कर्णधार करण्याची चर्चाही सुरू आहे.
Comments are closed.