IPL: कधीही शून्यावर आऊट झाला नाही, पाडला धावांचा पाऊस अन् जिंकली ऑरेंज कॅप

इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएलमध्ये आतापर्यंत १८ हंगाम खेळले गेले. २०२६ म्हणजे १९ वा हंगाम येत्या २८ मार्चपासून सुरु होत आहे. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते. पूर्ण स्पर्धेत उत्तम कामगिरी करण्याच्या प्रयत्नात धावा काढणे हे काही प्रत्येक फलंदाजांना जमत नाही, कारण एखादे वेळी लवकरच विकेट पडली तर निराशा येते. आयपीएलमध्ये एक असा फलंदाज आहे जो एकदाही शून्यावर बाद झाला नाही. त्याने फलंदाजीत सातत्य राखत शून्यावर बाद न होता सर्वाधिक धावा केल्या आणि ऑरेंज कॅपही आपल्या नावे केली.
गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन याने ही कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये त्याने २०२२ पासून आतापर्यंत ४० सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याची सरासरी ४९.८१ अशी उत्तम राहिली असून त्याने १७९३ धावा केल्या आहेत. त्यामध्ये २ शतके आणि १२ अर्धशतकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे तो एकदाही शून्यावर बाद झाला नाही.
मागील हंगामात सुदर्शनने कमालीची फलंदाजी केली. त्याने १५ सामन्यांत एक शतक आणि ६ अर्धशतकांसह ७५९ धावा केल्या. यावेळी त्याची सरासरी ५४.२१ आणि स्ट्राईक रेट १५६.१७ राहिला. यामध्ये तो एकदाही शून्यावर बाद झाला नाही. या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर त्याने ऑरेंज कॅप जिंकली. त्याने गुजरातला अनेकदा चांगली सुरूवात करून दिली आहे.
सुदर्शनबरोबरच कोलकाता नाईट रायडर्सचा रिंकू सिंग यानेही अनोखा विक्रम केला आहे. त्याने आयपीएलमध्ये एकदाही शून्यावर बाद न होता १००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्याने आयपीएलमध्ये ५९ सामने खेळले आहेत. त्यामध्ये ४ अर्धशतकांसह १०९९ धावा केल्या.
Comments are closed.