PBKS vs RR: पंजाबचा 'हा' खेळाडू ठरला राजस्थानसाठी डोकेदुखी!
आयपीएल 2025 स्पर्धेतील आज 18 मे रोजी डबल हेडर मधील 59 वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघामध्ये खेळला गेला. या सामन्यात पंजाबने राजस्थानचा 10 धावांनी पराभव केला. या सामन्यात पंजाबने प्रथम फलंदाजी करत 219 धावा केल्या होत्या. नंतर धावांचा पाठलाग करताना 20 षटकात राजस्थान संघ 209 धावा करू शकला. हा सामना जिंकून पंजाबने प्लेऑफच्या रेसमध्ये त्यांचे स्थान पक्के केले आहे.
पंजाबच्या या विजयामध्ये सर्वात मोठे योगदान नेहाल वढेराने दिले. त्याने 70 धावांची तुफानी पारी खेळत अर्धशतक झळकावले. त्याने 37 चेंडूत 70 धावा करत 5 षटकार तसेच 5 चौकार झळकावले. त्याने 189.19 या धावा केल्या. याचबरोबर पंजाबसाठी हरप्रीतने 3 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या.
सहज 🤝 प्रभावी
हंगामातील 2 -पन्नास सह नेहल वाधेरा 🔥
दोघेही विरुद्ध येत आहेत #आरआर 👌
अद्यतने ▶ https://t.co/htpvgew6ef #Takelop | #Rrvpbks | @पंजबकिंग्सिप्ल | @नेहलवाधेरा pic.twitter.com/jp60ju6pzo
– इंडियनप्रिमियरलीग (@आयपीएल) मे 18, 2025
जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये खेळलेल्या या सामन्यात राजस्थानला जिंकण्यासाठी 220 धावांचं आव्हान मिळालं होतं. यशस्वी जयस्वाल आणि वैभवने त्यांच्या संघासाठी चांगली सुरुवात केली. दोघांनी मिळून पाचव्या षटकापर्यंत 60 धावा केल्या. परंतु याचा काहीही उपयोग झाला नाही. राजस्थान प्लेऑफ मधून याआधीच बाहेर झालं आहे. या विजया सोबतच पंजाबने प्लेऑफमध्ये त्यांच्या संघाचे स्थान निश्चित केले आहे.
राजस्थानसाठी आज संजू सॅमसन सामन्यासाठी परतला होता. पण तो फक्त 20 धावा करून बाद झाला. रियान पराग कडून संघाला अपेक्षा होती पण त्याला 13 धावांवर हरप्रीतने क्लीन बोल्ड करून बाद केले. राजस्थानला शेवटच्या षटकात 30 धावांची गरज होती, 19 व्या षटकात अर्शदीप सिंग गोलंदाजी करण्यासाठी आला होता, ज्यामध्ये त्याने फक्त 8 धावा दिल्या आणि तिथेच पंजाबचा विजय निश्चित झाला.
Comments are closed.