भारत-इंग्लंड मालिकेत 32 वर्षांचा जुना रेकार्ड तुटला, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात दुसऱ्यांदाच घडला 'असा' पराक्रम!
भारत वि इंग्लंड कसोटी मालिका रेकॉर्डः भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत ओव्हलच्या मैदानावर खेळल्या जात असलेल्या शेवटच्या सामन्याच्या चौथ्या दिवशी, 32 वर्षांच्या एका मोठ्या रेकाॅर्डची बरोबरी झाली. या मालिकेत दोन्ही संघांच्या फलंदाजांनी मिळून 7,000 हून अधिक धावा केल्या, ज्यात एकूण 50 वेळा 50+ धावांच्या खेळी पाहायला मिळाल्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात इतक्या वेळा 50+ धावांच्या खेळी झाल्याची ही दुसरीच वेळ आहे. (Most Fifty Plus Scores Test)
5 सामन्यांच्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील (IND vs ENG Test Series) जवळपास प्रत्येक सामन्यात दोन्ही संघांच्या फलंदाजांकडून शानदार प्रदर्शन पाहायला मिळाले, ज्यामुळे गोलंदाजांसाठी गोलंदाजी करणे अजिबात सोपे नव्हते. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 1993 मध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या मालिकेत दोन्ही संघांच्या फलंदाजांनी मिळून 50 वेळा 50+ धावांच्या खेळी केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर 1920-21 ची ॲशेस मालिका आहे, जी ऑस्ट्रेलियात खेळली गेली होती आणि या मालिकेत एकूण 49 वेळा 50+ धावांच्या खेळी पाहायला मिळाल्या होत्या.
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक 50+ धावांच्या खेळी
भारत विरुद्ध इंग्लंड – 50 (इंग्लंड, 2025)
इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया – 50 (ऑस्ट्रेलिया, 1993)
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड – 49 (ऑस्ट्रेलिया, 1920-21)
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज – 46 (ऑस्ट्रेलिया, 1960-61)
ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज – 46 (ऑस्ट्रेलिया, 1968-69)
अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक 50+ धावांच्या खेळी एखाद्या खेळाडूच्या बॅटमधून निघाल्या असतील, तर तो भारतीय संघाचा खेळाडू रवींद्र जडेजा आहे, ज्याची या मालिकेत उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळाली आहे. जडेजाने 5 कसोटी सामन्यांमध्ये 1 शतकी खेळी आणि 5 अर्धशतकी खेळी केल्या आहेत. जडेजाने या मालिकेत 86च्या सरासरीने एकूण 516 धावा केल्या आहेत. (Ravindra Jadeja Batting Performance)
Comments are closed.