'ही' विशेष साप्ताहिक ट्रेन उत्तर महाराष्ट्रातून धावणार; कोणत्या स्टेशनवर कोण थांबणार?

उन्हाळी स्पेशल ट्रेन | उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर वाढत्या गर्दीचा सामना करण्यासाठी पश्चिम रेल्वेने उधना (गुजरात) आणि मालदा टाउन (पश्चिम बंगाल) दरम्यान साप्ताहिक विशेष ट्रेन सुरू केली आहे. रेल्वे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागू नये आणि या उन्हाळ्याच्या दिवसात लांबचा प्रवास आरामात करता यावा, या उद्देशाने ही विशेष ट्रेन सुरू करण्यात आली आहे. या नवीन सेवेचा उद्देश पुढील काही महिन्यांत दोन्ही राज्यांमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांसाठी प्रवास सुलभ करणे आहे. उधना (गुजरात) ते मालदा टाउन (पश्चिम बंगाल) या विशेष ट्रेनमुळे उत्तर महाराष्ट्र, मध्य प्रदेशातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.
ट्रेनचे वेळापत्रक जाणून घेण्यासाठी, उधना – मालदा टाउन स्पेशल ट्रेन (ट्रेन क्र. ०९०३३) साप्ताहिक आधारावर ९ एप्रिल ते २३ जुलै २०२६ या कालावधीत धावेल. ही ट्रेन उधना येथून दुपारी 23:00 वाजता सुटेल आणि शनिवारी सकाळी 11:00 वाजता मालदा टाउनला पोहोचेल. तर परतीच्या प्रवासात, मालदा टाउन-उधना स्पेशल ट्रेन (ट्रेन क्र. ०९०३४) दर रविवारी १२ एप्रिल ते २६ जुलै २०२६ पर्यंत धावेल. ही ट्रेन मालदा टाउनहून सकाळी ९:३० वाजता सुटेल आणि मंगळवारी सकाळी १:२० वाजता उधना येथे पोहोचेल. उन्हाळी स्पेशल ट्रेन
प्रवाशांच्या सोयीसाठी या विशेष गाडीला महत्त्वाच्या ठिकाणी थांबे देण्यात आले आहेत. लांबच्या प्रवासादरम्यान ही विशेष गाडी नंदुरबार, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज चिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय, बक्सर, आरा, पटना, बख्तियारपूर, मोकामा, किउल, अभयपूर, जमालपूर, सुलतानगंज, भागलपूर, कहालगाव, साहिबगंज, बरहरवा आणि न्यू फरक्का रेल्वे स्थानकांवर थांबेल. देशाच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे धावणाऱ्या या ट्रेनमुळे अनेक प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे. उन्हाळी स्पेशल ट्रेन
या गाड्या लांब पल्ल्याच्या आणि रात्रभर प्रवास करण्यासाठी असल्याने त्यामध्ये वातानुकूलित, स्लीपर आणि जनरल क्लास यांसारखे विविध प्रकारचे डबे विविध प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी असतील.
Comments are closed.