वैभव सूर्यवंशीची 'ही' खास गोष्ट त्याला इतर फलंदाजांपेक्षा वेगळं ठरवते; झाला मोठा खुलासा
आयपीएल 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीची बॅट चांगलीच तळपतेय. आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये त्याने वादळी फलंदाजी करत गोलंदाजांची अक्षरशः पळताभुई थोडी केली आहे. जगभरातील दिग्गज गोलंदाजांसमोर तो अत्यंत निडरपणे फलंदाजी करत आहे. त्याने जसप्रीत बुमराहला पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला, तर सुनील नरेनला षटकार मारण्यासाठी त्याने केवळ 2 चेंडू घेतले. अशा परिस्थितीत, अवघ्या 15 व्या वर्षी वैभवकडे असं नेमकं काय आहे, ज्यामुळे तो प्रत्येक गोलंदाजावर वर्चस्व गाजवताना दिसतोय, असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे.
कोलकाता विरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल यांच्या बॅटचा वेग (बॅट स्पीड) मोजण्यात आला, तेव्हा वैभव जयस्वालच्या खूप पुढे असल्याचे दिसून आले. त्याच्या बॅटचा वेग जयस्वालच्या तुलनेत दुप्पट होता. याच कारणामुळे तो गोलंदाजाला लवकर ओळखून मोठे फटके मारू शकतो.
Comments are closed.