3 महिन्यांत भारताला भेट देणारे हे तिसरे अफगाण मंत्री असतील.
आरोग्यमंत्री लवकरच दौऱ्यावर : पाकिस्तानच्या अस्वस्थतेत पडणार भर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अफगाणिस्तानचे आरोग्यमंत्री चालू आठवड्यात भारतात येणार आहेत. हा मागील तीन महिन्यांमध्ये अफगाणिस्तानकडून होणारा तिसरा मोठा दौरा असणार आहे. यापूर्वी तालिबानचे विदेशमंत्री आणि वाणिज्यमंत्री भारतात आले आहेत. अफगाणिस्तानच्या आरोग्यमंत्र्यांचा हा भारत दौरा दोन्ही देशांच्या संबंधांना आणखी मजबूत करणार आहे. खासकरून पाकिस्तान या द्विपक्षीय संबंधांमध्ये फूट पाडू पाहत असताना हा दौरा होत आहे. तर अफगाणिस्तानचे मंत्री भारताचा दौरा करत असल्याने पाकिस्तानच्या अस्वस्थतेत भर पडणार आहे.
अफगाणिस्तानचे आरोग्यमंत्री मौलवी नूर जलाल जलाली लवकरच भारताच्या दौऱ्यावर असणार आहेत. जलाली यांचा हा दौरा ऑक्टोबरमध्ये विदेशमंत्री अमीर खान मुत्ताकी आणि नोव्हेंबरमध्ये वाणिज्यमंत्री नूरुद्दीन अजीजी यांच्या दौऱ्यानंतर होतोय. तालिबानच्या““““““““““““ आरोग्यमंत्र्यांचा हा दौरा भारत-अफगाणिस्तान दरम्यान आरोग्य सहकार्याला वाढविणारा ठरणार आहे. भारत अफगाणिस्तानला सातत्याने मानवीय सहाय्य करत आहे.
पाकिस्तानचे विघटन होईल
भारत अफगाणिस्तानात अनेक आरोग्य प्रकल्पांवर काम करत आहे. यात काबूल येथील इंदिरा गांधी इन्स्टीट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थमध्ये थॅलेसीमिया सेंटरची स्थापना, एक आधुनिक डायग्नोस्टिक सेंटर आणि हीटिंग सिस्टीम निर्मिती सामील आहे. याचबरोबर भारत अफगाणिस्तानच्या बाग्रामी जिल्ह्यात 30 बेडचे एक रुग्णालय उभारण्याच्या योजनेवरही काम करत आहे. तसेच कॅन्सरवरील उपचारासाठी एक केंद्र, ट्रॉमा सेंटर तसेच 5 मॅटरनिटी क्लीनिकही सुरू करणार आहे.
अफगाणिस्तानला भरीव मदत
भारताने अफगाणिस्तानच्या दिव्यांग नागरिकांना कृत्रिम अवयव प्रदान करत आहे. तसेच भारताने 16 टनापेक्षा अधिक औषधे अफगाणिस्तानला प्रदान केली आहेत. याचबरोबर फ्ल्यू आणि मेनिनजाइटिस यासारख्या आजारांपासून वाचण्यासाठी भारताने अफगाणिस्तानला आवश्यक वैद्यकीय सहाय्य देखील केले आहे. भारत अफगाणिस्तानच्या सार्वजनिक आरोग्ला समर्थन देण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचे विदेशमंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.
Comments are closed.