वर्ध्यात हजारोंची नावे मतदार यादीत दोनदा, गावात अन् शहरातही नाव; काँग्रेस नेत्यानं पुढे आणली या
वर्धा : काँग्रेस नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (राहुल गांधी) यांनी थेट निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित करत, लाखो मतदार बोगस असल्याचा दावा केला. आपल्या पत्रकार परिषदेतून राहुल गांधींनी केंद्रातील मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर मतचोरीचा आरोप केला होता. त्यानंतर, निवडणूक आयोगानेही पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. तसेच, राहुल गांधींचे आरोप चुकीचे असून निवडणूक आयोग हा कुठल्याही पक्षाचा नाही, तो सर्वांसाठी समान असल्याचं म्हटलं. तर, मतदारांचे (Voter) सीसीटीव्ही देण्याबाबत प्रायव्हसीचं कारण नकारही दिला. मतदारयादीसंदर्भात आयोगाने स्थानिक यंत्रणांकडे बोट दाखवलं असून आता राहुल गांधींनंतर वर्धा (Vardha) जिल्ह्यातही काँग्रेस नेत्याने मतदार यादीतील घोळ समोर आणला आहे. त्यानुसार, 16000 मतदारांचे स्थलांतर झाले असतानाही त्यांचे नाव जुन्याच यादीत असल्याचं त्यांनी समोर आणलं आहे.
वर्धा जिल्ह्यात विविध मतदार संघात मतदारांची नावे दोन ते तीन ठिकाणी असल्याची बाब काँग्रेसचे राष्ट्रीय समन्वयक शैलेश अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत समोर आणली आहे. वर्धा जिल्ह्यातील केवळ वीस टक्के मतदार याद्याची छाननी केली असता साडेचार हजार मतदार हे मतदार यादीत दोनदा नावं असलेले आढळून आले आहे. सुमारे 16 हजार मतदार हे मायग्रेट झाले असतांनाही मतदार यादीत दोनदा नावं असलेले आढळून आले आहे. केवळ वीस टक्के छाननी केल्यावर हा घोळ आढळून आला असल्याचे शैलेश अग्रवाल यांनी सांगितले आहे.
वर्धा जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघातील 16,360 लोकं अशी आहेत, ज्यांची नावे ग्रामपंचायत आणि नगरपालिकेतही आहेत. हे मतदार ग्रामपंचायत निवडणुकीतही मतदान करतात आणि महानगरपालिका निवडणुकीतही मतदान करतात, असे अग्रवाल यांनी म्हटले. वर्धा जिल्ह्यातील वर्धाआर्वी, हिंगणघाट विधानसभा मतदार संघात हा घोळ सर्वाधिक आहे. म्यॅन्युअल पीडीएफ डेटामधून हा घोळ समोर आला आहे. एकाच माणसाचं एकाच बूथवरती वेगवेगळ्या ठिकाणी नाव आहे. एकाच व्यक्तीचं एकाच मतदारसंघात दोन तीन वेगवेगळ्या बुथवर नाव आहे, एकाच व्यक्तीचं ग्रामीण क्षेत्रात सुद्धा मतदार यादीत नाव आहे आणि शहरीक्षेत्रात नगरपालिका क्षेत्रात सुद्धा त्याचं नाव आहे. वेगवेगळ्या इपीक नंबरसोबत सारखे नावं आहेत.
हेही वाचा
पावसाचा जोर उद्याही कायम राहणार; मुंबईसह 4 जिल्ह्यातील शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर
आणखी वाचा
Comments are closed.