ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बेरोजगार तरुणांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या

आज ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या यांच्याविरोधात बेरोजगार तरुणांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. निवडणुकीच्या काळात राज्यातील १० लाख तरुण तरुणींना लाडका भाऊ योजनेंतर्गत (युवा कार्य प्रशिक्षणार्थी) रोजगार देण्याची घोषणा देत ३६ जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिकांमध्ये स्टायपेंड देत कामाला ठेवले, निवडणुका संपल्यावर त्यांना वाऱ्यावर सोडले. हे तरुण आता पुन्हा बेरोजगार झाले असून ४ महिन्यापासून त्यांना मानधनाची कवडीही मिळाली नाही.
यातच आज हजारो बेरोजगार तरुण तरुणींनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. आठवडाभरात निर्णय घ्या अन्यथा सरकारला दिवाळी साजरी करू देणार नाही, असा इशारा या तरुणांनी दिला.
Comments are closed.