पुढच्या वेळी डोक्यात गोळी घालू…, लॉरेन्स बिश्णोई गॅंगकडून गायक बादशाहला धमकी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रॅपर आणि गायक बादशाहने त्याच्या नवीन हरयाणवी गाण्याच्या ‘टटिरी’ गाण्याच्या बोल आणि दृश्यांशी संबंधित वादाच्या पार्श्वभूमीवर लॉरेन्स बिश्णोई गँग आता वादात सापडली आहे. पानिपत गोळीबार घटनेची जबाबदारी घेण्यासोबतच लॉरेन्स बिश्णोई गँगने फेसबुक पोस्ट जारी करून बादशाहच्या थेट डोक्यात गोळी घालण्याची धमकी दिली आहे. बादशाह त्याच्या गाण्यातून हरयाणाच्या संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप बिश्णोई गँगने केला आहे.

पोस्टमध्ये लिहिले की, बादशाह तू हरयाणाच्या संस्कृतीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला आहेस. 2024 मध्ये, आम्ही तुला तुझ्या क्लबमध्ये ट्रेलर दाखवला. पुढच्या वेळी, आम्ही तुझ्या थेट डोक्यात गोळी घालू. बादशाहचे “टटिरी” हे गाणे 1 मार्च रोजी रिलीज झाले. त्यानंतर बादशहा कायदेशीर अडचणीत सापडला. बादशाहने या वादाबद्दल जाहीरपणे माफी मागितली आणि सांगितले की त्याचा हेतू कोणालाही दुखावण्याचा नव्हता, तरीही हा वाद कायम आहे.

Comments are closed.