बॉम्बने एअर इंडिया विमान उडवून देण्याची धमकी

मुंबई ते न्यूयॉर्क फेरी : विमानात 322 प्रवासी : साडेआठ तासांच्या उड्डाणानंतर माघारी

वृत्तसंस्था/ मुंबई

एअर इंडियाचे एक विमान मुंबईहून न्यूयॉर्कला निघाले असताना बॉम्बची धमकी मिळाल्याने ते माघारी बोलावण्यात आले. एअर इंडियाचे बोईंग 350 विमान 303 प्रवासी आणि 19 क्रू मेंबर्ससह उड्डाण करत असताना ही धमकी मिळाली. बॉम्बच्या धमकीसंबंधी माहिती मिळताच ते मुंबई विमानतळावर माघारी बोलविण्यात आले. विमान मुंबईत परतल्यानंतर बॉम्ब शोधण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, तपासात काहीही समोर न आल्याने धमकी खोटी निघाली. सदर विमानाने मुंबईहून सोमवारी पहाटे 2 वाजता उड्डाण केले होते. ते सकाळी 10.25 वाजता पुन्हा विमानतळावर दाखल झाले. विमानात बॉम्ब नसल्याची खात्री झाल्यानंतर त्याची पुढील उड्डाणासाठी वेळ निश्चित करण्यात आली आहे. प्रवाशांच्या गैरसोयीबद्दल एअर इंडियाने दिलगिरी व्यक्त केली आहे.

Comments are closed.