विमानतळ आणि ताजमहल पॅलेस हॉटेल बॉम्बने उडविण्याची धमकी

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ताजमहल पॅलेस हॉटेल बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मुंबई पोलिसांना प्राप्त झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून सर्व यंत्रणांना सतर्क केले आहे. बॉम्बने उडविण्याच्या या धमकीच्या ई-मेलमध्ये दहशतवादी अफजल गुरू तसेच सॅवक्कू शंकर याच्या फाशीबाबतचा उल्लेख करण्यात आल्याचे सूत्रांकडून समजते. मुंबईतील विमानतळ पोलिसांना अज्ञात व्यक्तीने ई-मेल केला आहे. ई-मेल पाठविणाऱ्याचा पोलीस शोध घेत आहेत.

Comments are closed.