भारत-पाक युद्ध थांबण्याआधीच ‘या' स्टेडियमला बॉम्बने उडवण्याची धमकी
भारत पाकिस्तान मधील युद्ध आता थांबवण्यात आले आहे. पण हा तणाव थांबवण्याआधी इंदोरच्या होळकर स्टेडियमला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. मेलच्या माध्यमातून ही धमकी मध्यप्रदेश क्रिकेट असोसिएशनला देण्यात आली होती. यानंतर बोर्डाने ई-मेल ची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी या गोष्टीची तपासणी केली असता, त्यांना अशी कोणतीही वस्तू सापडली नाही. ज्यामुळे कोणालाही नुकसान होऊ शकेल.
शुक्रवार 9 मे रोजी दिल्ली क्रिकेट असोसिएशन डे अरुण जेटली स्टेडियमला बॉमने उडवण्याची धमकी देण्यात आली होती. याची तक्रार दिल्ली पोलिसांना करण्यात आली होती. या मेलमध्ये सांगण्यात आले की, आमच्याकडे पूर्ण भारतासाठी पाकिस्तानचे इमानदार स्लीपर सेल आहे. याआधी 8 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमला सुद्धा बॉमने उडवण्याची धमकी देण्यात आली होती.
या धमकीनंतर मोठी अपडेट समोर आली आहे की, भारत पाकिस्तान युद्ध अखेर कार संपले आहे. ही माहिती भारत सरकारकडून देण्यात आलेली आहे. यानंतर क्रिकेटच्या चाहत्यांच्या मनात आनंद निर्माण झाला असेल की, आता आयपीएल पुन्हा सुरू होईल. पण बीसीसीआयकडून याविषयी अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
दिल्ली-पंजाबमध्ये थांबवण्यात आलेल्या सामन्यानंतर बीसीसीआयने तात्काळ बैठक बोलावली होती. यानंतर 9 मे रोजी आयपीएल स्पर्धा आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. आता भारत पाकिस्तान मधील तणाव कमी झाल्यानंतर आशा आहे की, आयपीएल स्पर्धा लवकर सुरू केली जाऊ शकते.
Comments are closed.