लाल किल्ल्याजवळ तीन काडतुसे सापडली

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक खुलासा समोर आला आहे. लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाच्या ठिकाणाहून तीन 9 मिमी-कॅलिबर काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. यापैकी दोन जिवंत काडतुसे असून एक रिकामी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. आता ही काडतुसे स्फोटानंतर आय-20 कारमधून पडली का यासंबंधीचा तपास पोलीस करत आहेत. सर्वसामान्य लोक 9 मिमी पिस्तूल बाळगू शकत नाहीत. अशाप्रकारची काडतुसे सामान्यत: फक्त सशस्त्र दल किंवा पोलीस वापरतात. मात्र, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोलिसांना घटनास्थळी कोणतेही पिस्तूल किंवा त्याचा अन्य कोणताही भाग सापडला नाही.

Comments are closed.