रशियाचा युक्रेनवर हल्ला; तिघे ठार, अनेक जखमी

रशियाने आज पुन्हा युक्रेनला टार्गेट केले. युक्रेनच्या विविध ठिकाणांना लक्ष्य करत रशियाने मिसाईल आणि ड्रोनद्वारे हल्ला केला. यात तिघांचा मृत्यू तर अनेक नागरिक जखमी झाल्याची माहिती युक्रेनच्या अधिकाऱयांकडून देण्यात आली.
युक्रेनच्या निप्रॉपेट्रोस, मायकोलाइव, चेर्निहाइव, जापोरिजिया, पोल्टावा, कीव, ओडेसा,सुमी आणि खार्किवसहीत नऊ ठिकाणी रशियाकडून जोरदार हल्ला करण्यात आला. आज झालेला हल्ला म्हणजे जाणीवपूर्वक आमच्या नागरिकांना घाबरविण्याचे व देशातील पुरातन वास्तूंना नुकसान पोहचविण्याचे हे रशियाचे कारस्थान असल्याचे युक्रेनचे राष्ट्रपती झेलेस्की यांनी त्यांच्या टेलिग्राम खात्यावर म्हंटले आहे. गेल्या तीन वर्षांपासून युक्रेन आणि रशिया यांच्यात युद्ध सुरू आहे.
Comments are closed.