पेनसिल्व्हेनियात फुटबॉल सामन्यानंतर कपल्स स्टेडियमबाहेर गोळीबार; 3 जखमी, हल्लेखोर फरार
पेनसिल्व्हेनियामधील पिट्सबर्ग येथे फुटबॉल सामन्यानंतर कपल्स स्टेडियमबाहेर गोळीबाराची घटना घडली. या गोळीबारात तीन जण जखमी झाले आहेत. फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या वादातून हा गोळीबार झाला. पिट्सबर्ग सार्वजनिक सुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री 9.50 च्या सुमारास ही घटना घडली.
लोकमत टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, वाद झाल्यानंतर दोन पुरुष आणि एका महिलेवर गोळ्या झाडण्यात आल्या. प्रेक्षक स्टेडियममधून बाहेर पडत असतानाच ही घटना घडली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. सर्व पीडित किशोरवयीन असून, त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे पिट्सबर्गचे पोलीस प्रमुख जेसन लँडो यांनी सांगितले. गोळ्या झाडल्यानंतर हल्लेखोर फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
Comments are closed.