Helicopter Crash – अमेरिकेत पर्यटकांचे हेलिकॉप्टर कोसळले, अपघातात 3 जणांचा मृत्यू; दोन जखमी
अमेरिकेतील काउई येथील हवाई बेटावरील पर्यटकांचे हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. काउई येथील हवाई बेटावरील कलालाऊ समुद्रकिनाऱ्यावर गुरूवारी दुपारी ही दुर्घटना घडली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये एक पायलट आणि चार पर्यटक होते. दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून, इतर दोघांना उपचारासाठी विल्कॉक्स मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. हे हेलिकॉप्टर एअरबोर्न एव्हिएशनद्वारे चालवले जात असल्याचे सांगितले. हा समुद्रकिनारा काउईच्या उत्तर किनाऱ्यावरील ना पाली कोस्टवर आहे. ना पाली कोस्टवरील डोंगर, समुद्रकिनारे आणि धबधबे पाहण्यासाठी हेलिकॉप्टर टूर हा एक लोकप्रिय मार्ग आहे.
Comments are closed.