छत्तीसगडमध्ये तीन नक्षलवादी ठार
सुकमा-बिजापूर सीमेवर चकमक
वृत्तसंस्था/रायपूर
छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात गुरुवारी नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार चकमक झडली. गुरुवारी सकाळी विजापूर आणि सुकमाच्या सीमेवरील जंगलात गोळीबार सुरू झाला. यामध्ये 3 नक्षलवादी मारले गेल्याचे सायंकाळी एका अधिकाऱ्याने सांगितले. नक्षलवाद्यांविरुद्ध सुरू असलेल्या संयुक्त कारवाईदरम्यान ही चकमक सुरू झाली. यामध्ये जिल्हा राखीव रक्षक दल, विशेष कार्य दल आणि सीआरपीएफच्या कोब्रा युनिटचे सैनिक सहभागी झाले होते. यापूर्वी 4 जानेवारी रोजीही अबुझहमद परिसरात नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली होती. यानंतर, सुरक्षा दलांनी शोध मोहीम राबवल्यानंतर पाच नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये दोन महिलांचाही समावेश होता. या चकमकीत एका जवानालाही प्राण गमवावे लागले. सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून एके-47 रायफल, एसएलआर आणि अनेक स्वयंचलित शस्त्रs जप्त केली. त्यापूर्वी 3 जानेवारी रोजीही एका नक्षलवाद्याला चकमकीत ठार करण्यात आले.
Comments are closed.