रत्नागिरी न्यूज – रत्नागिरी जिल्हा आणि वासे

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी गुन्हेगारांच्या तडीपारीचे प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केले होते. त्याप्रस्तावानुसार उपविभागीय अधिकाऱ्यांनी रत्नागिरीतील दोन आणि लांजातील एका गुन्हेगाराला दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी सराईत गुन्हेगारांवर ठोस आणि परिणामकारक कारवाई करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार रत्नागिरी शहरातील सलमान उर्फ आकाश अशोक डांगे (रा. थिबा पॅलेस) याच्याविरोधात अंमली पदार्थ विक्री आणि अन्य गुन्हे होते. त्याचबरोबर अमिर नजीर मुजावर (रा. राजिवडा) याच्याविरोधात महिलांबाबत गंभीर गुन्हे आणि अन्य गुन्हे दाखल होते. या दोघांच्या तडीपारीचे प्रस्ताव पोलिसांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केले होते.
या प्रस्तावाचा उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर आणि शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी पाठपुरावा केल्यानंतर सलमान उर्फ आकाश डांगे आणि आमिर मुजावर या दोघांना उपविभागीय अधिकारी यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि कोल्हापूर या जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार केले आहे.
लांजा तालुक्यातील सराईत गुन्हेगार गुरूनाथ यशवंत तावडे रा.शिपोशी यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल होते.लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम आणि पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे यांनी गुरूनाथ तावडे याचा तडीपारीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केला होता.उपविभागीय अधिकारी यांनी गुरूनाथ तावडे याला रत्नागिरी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे.

Comments are closed.