भाजपची घराणेशाही… राहुल नार्वेकरांच्या कुटुंबातील तिघांना उमेदवारी
आमदार खासदारांच्या कुटुंबियांना महानगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारी दिली नसल्याचा दावा करणाऱ्या भाजपने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबातील तिघांना तिकीट दिल्याचे समोर आले आहे. त्यावरून आता पुन्हा भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.
राहुल नार्वेकर यांचे भाऊ मकरंद नार्वेकर, वहिनी हर्षिता नार्वेकर, आणि चुलत बहीण गौरवी शिवलकर–नार्वेकर यांना भाजपने तिकीट दिले आहे. विधानसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत हे तिन्ही उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याचे समजते.
नवाब मलिक कुटुंबातले तिघे मैदानात
अजित पवार गटाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत नवाब मलिक यांच्या कुटुंबातील तिघांना उमेदवारी दिली आहे. नवाब मलीक यांचे भाऊ कप्तान मलिक, त्यांची सून बुशरा मलिक आणि बहीण सईदा खान यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कप्तान मलिक प्रभाग क्र. 165, सईदा खान प्रभाग क्र. 168 तर बुसरा मलिक प्रभाग क्र. 170 मधून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Comments are closed.