झेलेन्स्की रशियाशी चर्चेसाठी तयार, मात्र पुतिन यांच्यासमोर ठेवली ‘ही’ अट

रशिया-युक्रेन युद्धाला तीन वर्षे पूर्ण झाले आहे. याचनिमित्त कीव येथे आयोजित शिखर परिषदेत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सोमवारी एक मोठे विधान केले आहे. ते म्हणाले आहेत की, “रशियाने युक्रेनियन लोकांना त्यांच्या तुरुंगातून मुक्त केलं पाहिजे. असं केल्यास युक्रेनही आपल्याकडील बंदी मुक्त करेल. हा सुरुवात करण्याचा एक योग्य मार्ग आहे.”

याआधी रविवारी (23 फेब्रुवारी) कीव येथे झालेल्या पत्रकार परिषदेत झेलेन्स्की म्हणाले होते, “जर युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित झाली आणि नाटो सदस्यत्वासाठी मला राजीनामा द्यावा लागत असेल तर, मी ताबडतोब पद सोडण्यास तयार आहे. मात्र त्या बदल्यात युक्रेनला नाटोमध्ये स्थान मिळाले पाहिजे.”

दरम्यान, रशिया-युक्रेन युद्धाला तीन वर्षे झाली आहेत. पण दोन्ही देशांमध्ये संघर्ष अजूनही सुरूच आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन युक्रेनमध्ये निवडणुका घेण्याबाबत चर्चा करत आहेत. याचदरम्यान झेलेन्स्की यांचे हे विधान समोर आले आहे. युक्रेनमध्ये मार्शल लॉ लागू आहे. ज्या अंतर्गत निवडणुका घेणे शक्य नाही.

Comments are closed.