Chandrapur news – वाघाच्या हल्ल्यात बांबू तोडणी कामगाराचा मृत्यू; जुनोना जंगलातील घटना

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चंद्रपूर जिल्ह्यातील वनविकास महामंडळाच्या जुनोना जंगलात वाघाच्या हल्ल्यात एका बांबू तोडणी कामगाराचा मृत्यू झाला. कलामसिंग उईके (वय – 64) असे मृत कामगाराचे नाव असून ते मध्य प्रदेशातील बालाघाट येथील रहिवासी होते. जंगल परिसरात काम करत असताना त्यांच्यावर वाघाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

या घटनेची माहिती मिळताच वनविकास महामंडळाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून, घटनेबाबत अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, जंगल परिसरात बांबू तोडणीसह विविध कामे करणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वनक्षेत्रात काम करताना वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांचा धोका कायम असल्याने मजुरांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी आवश्यक खबरदारी घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Comments are closed.