IND vs AUS: तिलक वर्माने घेतला जबरदस्त झेल, ट्रॅव्हिस हेडचा चेहरा पाहण्यासारखा! पाहा व्हिडिओ
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना मेलबर्नमध्ये खेळला गेला. या सामन्यात अभिषेक शर्माला (Abhishek Sharma) वगळता कोणताही भारतीय फलंदाज विशेष चमक दाखवू शकला नाही. टीम इंडियाने (Team india) मोठा स्कोर उभारण्यात अपयश आले. मात्र, क्षेत्ररक्षणादरम्यान तिलक वर्माने (Tilak Verma) अप्रतिम झेल घेऊन सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या त्या जबरदस्त कॅचनं चाहत्यांना कौतुकाचा वर्षाव करायला भाग पाडलं.
तिलक वर्माने ट्रॅव्हिस हेडचा (Travis Head) शानदार झेल पकडला. 4.3 षटकात हेडने चेंडू सीमारेषेबाहेर पाठवण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू नीट लागला नाही आणि मिडऑफ दिशेने गेला. तिथं फील्डिंग करत असलेल्या तिलक वर्माने हवेत झेप घेत जबरदस्त झेल घेतला. झेल घेताना त्याचं संतुलन बिघडलं होतं, पण त्याने अप्रतिम ‘प्रेझेन्स ऑफ माइंड’ दाखवत झेल पूर्ण केला. तिलकचा हा झेल सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
टिळक वर्मा यांच्याकडून एक आश्चर्यकारक. 🤯🔥 pic.twitter.com/rWKlr1fk0I
– जॉन्स. (@CricCrazyJohns) ३१ ऑक्टोबर २०२५
भारताने प्रथम फलंदाजी करताना 18.4 षटकांत 10 विकेट्स गमावून फक्त 125 धावा केल्या. शुभमन गिलने 10 चेंडूत 5 धावा, तर अभिषेक शर्माने 37 चेंडूत 68 धावांची दमदार खेळी केली. संजू सॅमसनने 4 चेंडूत 2 धावा, सूर्यकुमार यादवने 4 चेंडूत 1 धाव केली. तिलक वर्मा मात्र शून्यावर बाद झाला. त्याने 2 चेंडू खेळून एकही धाव केली नाही.
लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने फक्त 13.2 षटकांत आणि 4 विकेट्स राखून सामना जिंकला. मिचेल मार्शने 26 चेंडूत 46 धावा, तर हेडने 15 चेंडूत 28 धावा केल्या. जोश इंग्लिसने 20 चेंडूत 20 धावा केल्या. ऑस्ट्रेलियासाठी जोश हेजलवूडने 3 विकेट्स घेतल्या, तर भारतासाठी जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
 
			 
											
Comments are closed.