RCBच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! बिग बॅश लीगमध्ये 'या' स्टार खेळाडूने पाडला धावांचा पाऊस

आयपीएल 2025च्या हंगामापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी (Royal Challengers Bengaluru) एक आनंदाची बातमी आहे. अलिकडेच झालेल्या आयपीएल मेगा लिलावात (IPL Mega Auction) आरसीबीने ऑस्ट्रेलियाच्या टिम डेव्हिडला (Tim David) खरेदी केले होते. आता, टिम डेव्हिडने बिग बॅश लीगमध्ये एक वादळी खेळी केली. त्याने 38 चेंडूत 68 धावा केल्या. दरम्यान त्याने 4 चौकारांसह 6 षटकार ठोकले. त्याच्या या शानदार खेळीमुळे होबार्ट हरिकेन्सने सिडनी थंडरचा 6 गडी राखून धुव्वा उडवला.

आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये टिम डेव्हिडचा फोटो शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, टिम डेव्हिडने कठीण लक्ष्य सोपे केले. एकदा बिग बॅश लीगमध्ये एक वादळी खेळी. टिम डेव्हिडच्या खेळीनंतर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे चाहते सोशल मीडियावर खूप उत्साहित दिसत आहेत.

होबार्ट हरिकेन्स विरूद्ध सिडनी थंडर संघातील सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, टिम डेव्हिडच्या (Tim David) संघ होबार्ट हरिकेन्सने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना सिडनी थंडरने 20 षटकांत 6 गडी गमावून 164 धावा केल्या. सिडनी थंडरकडून डेव्हिड वॉर्नरने (David Warner) 66 चेंडूत सर्वाधिक 88 धावा केल्या.

याशिवाय सॅम बिलिंग्जने 15 चेंडूत 28 धावांचे योगदान दिले. प्रत्युत्तरात, होबार्ट हरिकेन्सने 16.5 षटकांत 4 गडी गमावून लक्ष्य गाठले. होबार्ट हरिकेन्सच्या विजयाचा खरा हिरो टिम डेव्हिड होता. तसेच, निखिल चौधरीने 23 धावा केल्या. सिडनी थंडरकडून जॉर्ज गॉर्टनने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

INDW vs IREW; भारताची विजयी सुरूवात, प्रतिका रावलची दमदार खेळी
बीसीसीआय जय शाह यांना करणार सन्मानित? कारण काय?
शाब्बास स्मृती! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केला नवा विक्रम, दिग्गज मिताली राजला टाकले मागे

Comments are closed.