Titwala News मोहन्यात कौटुंबिक वादातून मामाची हत्या

कौटुंबिक वादातून भाच्याने मामाची हत्या केल्याची घटना मोहने परिसरात घडली. मरियाप्पा नायर (४०) असे हत्या झालेल्या मामाचे नाव आहे. या हत्याकांडानंतर भाचा गणेश पुजारी पळून जाण्याच्या तयारीत असताना खडकपाडा पोलिसांनी सापळा रचून कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातून मुसक्या आवळल्या आहेत.

गणेश पुजारी हा गोरेगाव येथे राहत असून त्याचे नातेवाईक मोहने येथे राहतात. त्याची पत्नी गर्भवती असल्याने तिला प्रसूतीसाठी मोहन्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे गणेशचे मामा मरियाप्पासोबत घरगुती वाद झाला. यावर संतापलेल्या गणेशने मामाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत मामा मरियाप्पा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या मारहाणीचा व्हिडीओ सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने तपास करून गणेशला अटक केली.

Comments are closed.