Asia Cup Final: भारत-पाक सामन्यात टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरणार पाकिस्तानचे हे 5 खेळाडू! जाणून घ्या सविस्तर
बांगलादेशविरुद्ध 11 धावांनी विजय मिळवल्यानंतर पाकिस्तानने एसीसी (ACC) आशिया कप 2025 स्पर्धेच्या फायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे. फायनल सामना २८ सप्टेंबरला टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान दोन्ही संघात होणार आहे. या स्पर्धेत भारतीय टीमने (indian Cricket Team) पाकिस्तानला आधीच दोन वेळा हरवले आहे, त्यामुळे पाकिस्तान सध्या जास्त दबावाखाली दिसत आहे.
तरीही, टीम इंडियाला सावध खेळावे लागेल आणि पाकिस्तानच्या या 5 खेळाडूंसाठी चांगली तयारी करावी लागेल.
फायनलमध्ये टीम इंडियाला (Team india) पाकिस्तानच्या या 5 खेळाडूंसमोर मजबूत योजना आखावी लागेल. सलामी फलंदाज साहिबजादा फरहानने मागील सामन्यात भारताविरुद्ध चांगले प्रदर्शन केले होते, त्यामुळे तो त्याच फॉर्ममध्ये परत येण्याचा प्रयत्न करेल. त्याशिवाय, फखर जमानचा भारताविरुद्धचा रेकॉर्ड फायनलमध्ये चांगला आहे, आणि त्याच्याकडे सामना बदलण्याची क्षमता आहे. गोलंदाजीमध्ये सॅम अयूब आणि हरिस रऊफनेही आतापर्यंत चांगले प्रदर्शन केले आहे, त्यामुळे या दोघांविरुद्ध सावधपणे फलंदाजी करावी लागेल. शाहीन शाह अफरीदीलाही हलके घेऊ नये.
Comments are closed.