राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दर अर्ध्या झाले

निवडक प्लाझांवर वाहनधारकांना मोठा दिलासा : रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून अधिसूचना जारी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सरकारने काही निवडक राष्ट्रीय महामार्गावरील (नॅशनल हायवे) टोल दरात 50 टक्क्यांची मोठी कपात केली आहे. ही कपात विशेषत: उ•ाणपूल, पूल आणि भुयारी मार्ग बांधण्यात आलेल्या महामार्गांवर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे वाहनधारकांच्या प्रवासाचा खर्च कमी होईल. टोल कपातीचा नवीन नियम लागू झाला असून वाहनधारकांना लवकरच त्याचा लाभ मिळू लागेल.

राष्ट्रीय महामार्गांमध्ये बोगदे, पूल, उ•ाणपूल किंवा उंचावलेले रस्ते असलेल्या विभागांसाठी सरकारने टोल दर 50 टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. राष्ट्रीय महामार्गांवरील प्लाझावर ‘राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियम, 2008 नुसार’ टोल शुल्क वसूल केले जाते. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने 2008 च्या नियमांमध्ये सुधारणा करताना टोल शुल्क मोजण्यासाठी एक नवीन पद्धत किंवा सूत्र अधिसूचित केले आहे. त्यामुळेच सरकारने राष्ट्रीय महामार्गावरील टोल कर कमी केला आहे.

गणना कशी केली जाईल?

रस्ते वाहतूक मंत्रालयाने एक अधिसूचना जारी केली आहे. त्यात राष्ट्रीय महामार्गाच्या कोणत्याही भागात बांधलेल्या संरचनेचा (पूल, बोगदा, उ•ाणपूल किंवा उन्नत महामार्ग) वापराचा दर आकारताना नवी प्रणाली लागू केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार, संरचनेची लांबी दहाने गुणली जाईल आणि राष्ट्रीय महामार्गाच्या ज्या भागामध्ये रचना नाही त्या भागाच्या लांबीमध्ये जोडली जाईल. किंवा राष्ट्रीय महामार्गाच्या त्या भागाची एकूण लांबी पाचने गुणली जाईल. या दोघांपैकी जे कमी असेल ते विचारात घेतले जाईल. याचा अर्थ पूल, बोगदा किंवा उ•ाणपूलामुळे आकारला जाणारा टोल कमी केला जाईल. उदाहरणार्थ, जर राष्ट्रीय महामार्गाचा कोणताही भाग 40 किलोमीटर लांबीचा असल्यास 10×40 (संरचनेच्या लांबीच्या दहा पट) = 400 किमी किंवा राष्ट्रीय महामार्गाच्या भागाच्या एकूण लांबीच्या पाचपट म्हणजेच 5×40 = 200 किमी. या सूत्रानुसार, टोल दर कमी लांबीवर, म्हणजेच 200 किमीवर आकारला जाईल.

सध्याच्या नियमांनुसार, राष्ट्रीय महामार्गावर बांधलेल्या प्रत्येक किलोमीटरच्या संरचनेसाठी वापरकर्त्यांना दहापट जास्त टोल भरावा लागत होता. म्हणजेच, जर रस्त्यावर एक किलोमीटरचा पूल असेल तर तुम्हाला त्या एक किलोमीटरसाठी दहा किलोमीटरचा टोल भरावा लागत असे. पूर्वी पायाभूत सुविधा बांधणे जास्त महाग असल्यामुळे टोल मोजण्याची ही पद्धत होती. परंतु आता सरकारने लोकांना दिलासा देण्यासाठी टोलचे दर कमी केले आहेत, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

Comments are closed.