आज मध्यरात्रीपासून देशभरात टोलचे दर वाढणार आहेत
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशभरातील टोलनाक्यांवर 1 एप्रिलपासून नवीन नियम लागू होणार असल्यामुळे महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवरील प्रवास अधिक महाग होणार आहे. 31 मार्चच्या मध्यरात्रीपासून महामार्गावर प्रवास करण्यासाठी वाहन मालकांना 5 ते 25 रुपयांपर्यंत वाढीव टोल शुल्क आकारले जाईल. याचा थेट परिणाम वाहनधारकांच्या खिशावर होईल. वाढीव टोल शुल्क वसुली लागू करण्यासाठी टोल व्यवस्थापनाने सर्व प्रणाली अद्ययावत केल्या आहेत. हे सुधारित शुल्क 1 एप्रिल रोजी 00:00 वाजता आणि 31 मार्च रोजी 11:59:59 वाजता लागू होईल. म्हणजेच नियोजित वेळेनुसार आज मध्यरात्रीपासूनच सुधारित शुल्क आकारण्यास सुरुवात होईल.
Comments are closed.