IND vs ENG: सचिन-गावस्कर नव्हे! भारत-इंग्लंड कसोटीत 'या' दिग्गजाने केल्यात सर्वाधिक धावा

भारत वि इंग्लंड कसोटी मालिका: या महिन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाईल. ज्याची सुरूवात 20 जूनपासून सुरू होणार आहे आणि शेवट 4 ऑगस्ट रोजी होणार आहे. या कसोटी मालिकेसह भारतीय क्रिकेटमध्ये शुबमन गिल आणि गौतम गंभीर यांचे युग सुरू होईल. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर गिलला भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. या कसोटी मालिकेसह भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पुढील चक्राची सुरुवात करेल.

त्याच वेळी, या मालिकेत सर्वांच्या नजरा ज्या खेळाडूवर असतील तो खेळाडू जो रूट आहे. जो रूट इतिहासा रचण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरला मागे टाकण्याच्या रेकाॅर्डवर त्याच्या नजरा आहेत.

जरी सचिन तेंडुलकर अनेकदा रेकाॅर्डच्या बाबतीत अव्वल स्थानावर दिसला आहे, परंतु जर तुम्ही भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंची यादी पाहिली तर तुम्हाला ते तसे दिसणार नाही. तेंडुलकर या यादीत अव्वल फलंदाज नाही, तर इंग्लंडचा जो रूट येथे त्याच्या वर आहे. चला तर मग या बातमीद्वारे आपण भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या टाॅप-5 खेळाडूंबद्दल जाणून घेऊयात.

1) जो रूट- इंग्लंडच्या या महान फलंदाजाने 2012 ते 2024 पर्यंत भारताविरुद्ध एकूण 30 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 55 डावांमध्ये 58.08च्या सरासरीने 2,846 धावा केल्या. या काळात रूटने 10 शतकांसह 11 अर्धशतके झळकावली आहेत. रूटची सर्वोत्तम धावसंख्या 218 राहिली आहे.

2) सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)- 1990 ते 2012 पर्यंत, भारताच्या या महान फलंदाजाने इंग्लंडविरुद्ध 32 कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्याने 51.73च्या सरासरीने एकूण 2,535 धावा केल्या. या काळात ‘मास्टर-ब्लास्टर’ने 7 शतकांसह 13 अर्धशतके झळकावली.

3) सुनील गावस्कर (Sunil Gavaskar)- या यादीत ‘मास्टर-ब्लास्टर’ दुसऱ्या स्थानावर आहे, तर ‘लिटिल मास्टर’ तिसऱ्या स्थानावर आहे. दिग्गज कर्णधार सुनील गावस्कर यांनी 1971 ते 1986 दरम्यान इंग्लंडविरुद्ध 38 कसोटी सामने खेळले. या दरम्यान गावस्कर यांनी 38.20च्या सरासरीने 2,483 धावा केल्या, ज्यामध्ये 4 शतके आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे.

4) अ‍ॅलिस्टर कुक (Alastair Cook)- इंग्लंडचा हा माजी कर्णधार 2006 ते 2018 पर्यंत भारताविरुद्ध 30 कसोटी सामने खेळला. या दरम्यान, कुकने 54 डावांमध्ये 47.66च्या सरासरीने 2,431 धावा केल्या. कुकने भारताविरुद्धच्या कसोटी कारकिर्दीत 7 शतकांसह 9 अर्धशतके ठोकली आहेत.

5) विराट कोहली- अलिकडेच कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या कोहलीने 2012 ते 2022 दरम्यान इंग्लंडविरुद्ध 28 कसोटी सामने खेळले आहेत. या दरम्यान, कोहलीने 42.36च्या सरासरीने 1,991 धावा केल्या. कोहलीने या संघाविरुद्ध 5 शतके आणि 9 अर्धशतके झळकावली आहेत.

Comments are closed.