आयपीएलच्या एकाच हंगामात सर्वाधिक षटकार ठोकणारे टॉप 5 फलंदाज; पाहा या यादीत किती भारतीय!

इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामाची म्हणजेच आयपीएल 2026 ची घंटा वाजली आहे. या स्पर्धेची सुरुवात 28 मार्च पासून होणार असून हंगामाचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जाईल. दरम्यान, हंगामाच्या सुरुवातीपूर्वी आम्ही तुम्हाला अशा पाच खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी एकाच हंगामात सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. विशेष म्हणजे या यादीत एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही.

​या यादीत ख्रिस गेल अव्वल स्थानी आहे. एका हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम गेलच्या नावावर आहे. २०१२ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूसाठी खेळताना गेलने ५९ षटकार ठोकले होते. कोणत्याही फलंदाजाने एका हंगामात मारलेले हे आतापर्यंतचे सर्वाधिक षटकार आहेत. गेल्या १४ वर्षांपासून हा विक्रम गेलच्या नावावर कायम आहे.

​या यादीत दुसरे नाव आंद्रे रसेल याचे आहे. रसेलने २०१९ च्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्ससाठी खेळताना ५२ षटकार लगावले होते. विशेष म्हणजे, २०२५ च्या हंगामानंतर केकेआरने रसेलला रिलीज केले होते, त्यानंतर या कॅरेबियन अष्टपैलू खेळाडूने स्पर्धेतून निवृत्ती घेतली.

​या यादीत ख्रिस गेलचे नाव एकूण तीन वेळा येते. २०१२ मध्ये ५९ षटकार मारल्यानंतर, गेलने पुढच्याच हंगामात म्हणजेच २०१३ मध्ये आरसीबीसाठी खेळताना ५१ षटकार ठोकले होते. यासह तो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे.

​इंग्लंडचा फलंदाज jos बटलर याच्यासाठी २०२२ चा हंगाम अत्यंत शानदार ठरला होता. राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना बटलरने या हंगामात १७ सामन्यांच्या १७ डावांत ८६३ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने ४५ षटकार खेचले होते, ज्यामुळे बटलर आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार मारणारा चौथा फलंदाज ठरला.

​या यादीत ख्रिस गेल पाचव्या क्रमांकावरही पाहायला मिळतो. गेलने २०११ मध्येही आरसीबीसाठी खेळताना अप्रतिम फलंदाजी केली होती. त्या हंगामात त्याने ४४ षटकार मारले होते.

Comments are closed.