वनडेत एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतक ठोकणारे टॉप 5 खेळाडू, एकाने तिनदा रचला 'हा' इतिहास
क्रिकेटच्या इतिहासात काही फलंदाजांनी एकााच संघाविरुद्ध सलग भक्कम कामगिरी करून आपली खास ओळख निर्माण केली आहे. आज आपण अशाच टॉप 5 खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी एकााच संघाविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावली आहेत. या यादीतील खास बाब म्हणजे यात एकााच खेळाडूचे नाव तीन वेळा आहे, ज्यातून त्यांच्या फलंदाजीची सातत्यपूर्णता आणि दडपणाखाली खेळण्याची क्षमता दिसून येते. हा खेळाडू म्हणजे दुसरा कोणी नसून विराट कोहली, ज्यांनी श्रीलंका, वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या बलाढ्य संघांविरुद्ध अनेक शतके ठोकली आहेत. चला तर मग जाणून घेऊया ते पाच फलंदाज, ज्यांनी वनडे क्रिकेटमध्ये एखाद्या एकााच संघाविरुद्ध सर्वाधिक शतकांचा विक्रम केला आहे.
विराट कोहलीने 2008 ते 2024 या कालावधीत श्रीलंकेविरुद्ध 56 सामन्यांत 10 शतके झळकावली आहेत. या काळात त्यांचा सर्वोच्च स्कोर नाबाद 166 धावा इतका होता आणि त्यांचा सरासरी 60.27 इतका राहिला. कोहलीने या काळात एकूण 2652 धावा केल्या, ज्यामध्ये ते अनेक वेळा नाबाद राहिले. त्यांचा स्ट्राईक रेट 93.67 इतका होता.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावरही कोहलीचं नाव आहे. त्यांनी 2009 ते 2023 या कालावधीत वेस्ट इंडीजविरुद्ध 43 सामन्यांत 9 शतके ठोकली आहेत. या काळात त्यांचा सर्वोच्च स्कोर नाबाद 157 धावा इतका होता आणि त्यांची सरासरी 66.50 इतकी होती. त्यांनी वेस्ट इंडीजविरुद्ध एकूण 2261 धावा केल्या, ज्यातून दिसून येते की ते वेस्ट इंडीजविरुद्ध अत्यंत प्रभावी ठरले आहेत. त्यांचा स्ट्राईक रेटदेखील तब्बल 96.95 इतका पोहोचला होता.
क्रिकेटचे भगवान म्हणून ओळखले जाणारे सचिन तेंडुलकर यांनी 1991 ते 2012 या कालावधीत ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघाविरुद्ध 71 सामन्यांत 9 शतके झळकावली होती. त्यांचा सर्वोच्च स्कोर 175 धावा इतका होता. तेंडुलकर यांनी 44.59 च्या सरासरीने एकूण 3077 धावा केल्या होत्या. त्यांचा स्ट्राईक रेट 84.71 इतका होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांचा खेळ नेहमीच उत्कृष्ट राहिला आहे.
चौथ्या क्रमांकावर नाव आहे “हिटमॅन” रोहित शर्माचे, ज्यांनी 2007 ते 2025 या कालावधीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 46 सामन्यांत 8 शतके झळकावली आहेत. त्यांचा सर्वोच्च स्कोर 209 धावा इतका आहे. एकूण 2407 धावा करताना त्यांची सरासरी 57.30 आणि स्ट्राईक रेट 96.01 इतका होता. रोहितने अनेक वेळा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना आपल्या नावावर केला आहे.
कोहलीनेही ऑस्ट्रेलियाविरुद्ध 50 सामन्यांत 8 शतके झळकावली आहेत. या काळात त्यांचा सर्वोच्च स्कोर 123 धावा इतका होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी 93.69 च्या स्ट्राईक रेटसह 2451 धावा केल्या आहेत. त्यांची सरासरी 54.46 इतकी होती. कोहलीने
ऑस्ट्रेलियाविरुद्धदेखील सातत्याने धमाकेदार कामगिरी केली आहे.
Comments are closed.