2025 मध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पाडणारे टाॅप 7 फलंदाज, बघा यादीत किती भारतीय!
2025 या वर्षाचा निम्म्याहून अधिक काळ उलटून गेला आहे. या वर्षी आतापर्यंत फलंदाजांच्या बॅटवरून बरेच चौकार आणि षटकार दिसले आहेत. त्यापैकी काही प्रसिद्ध चेहरे आहेत. तर काही फलंदाज असे आहेत जे नवीन आहेत. त्यांनी आपल्या शानदार कामगिरीने या यादीत स्थान मिळवले आहे. या वर्षी सर्वाधिक चौकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये अनेक दिग्गज खेळाडू आहेत, त्यापैकी एक भारतीय कसोटी संघाचा कर्णधार देखील आहे. पण षटकार मारणाऱ्यांच्या यादीत असे खेळाडू आहेत, ज्यांना तुम्ही खेळताना क्वचितच पाहिले असेल. षटकार मारणाऱ्यांच्या यादीतून मोठी नावे गायब आहेत.
2025 या वर्षात सर्वाधिक चौकार मारणारे 7 फलंदाज
या यादीत सर्वात वर इंग्लंडचा फलंदाज बेन डकेट आहे. डकेटने आतापर्यंत तिन्ही फॉरमॅटमध्ये 172 चौकार मारले आहेत. या यादीत एकमेव भारतीय शुबमन गिल आहे. ज्याने 14 सामन्यांमध्ये 143 चौकार मारले आहेत. गिल दुसऱ्या क्रमांकावर आहे.
1- बेन डकेट- इंग्लंड- 172 चौकार
2- शुबमन गिल- इंग्लंड- 143 चौकार
3- जो रूट- इंग्लंड- 112 चौकार
4- ब्रायन बेनेट- झिम्बाब्वे- 108 चौकार
5- हॅरी ब्रुक- इंग्लंड- ९८ चौकार6
6- करणबीर सिंग- ऑस्ट्रिया- ९६ षटकार
7- कुशल मेंडिल- श्रीलंका- ९२ चौकार
2025 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे 7 फलंदाज
ही यादी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. मोठ्या देशांच्या अनेक दिग्गज खेळाडूंची नावे या यादीत नाहीत. या यादीत एकही भारतीय नाही. ऑस्ट्रियाचा करणबीर सिंग पहिल्या क्रमांकावर आहे. करणबीरने 24 सामन्यांमध्ये 74 षटकार मारले आहेत. तथापि, या यादीत एक पाकिस्तानी खेळाडू आहे. जो 7 व्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 16 सामने खेळून 33 षटकार मारले आहेत.
करणबिनार सिंग- ऑस्ट्रिया- 74 षटकार
फियाज अहमद- बहरीन- 52 षटकार
बिलाल झाल्माई- ऑस्ट्रिया- 43 षटकार
जे बेकर- केमन- 37 षटकार
जॉर्ज मुनसे- स्कॉटलंड- 36 षटकार
आसिफ अली- बहरीन- 35 षटकार
हसन नवाज- पाकिस्तान- 33 षटकार
Comments are closed.