IPL मध्ये पर्पल कॅप न जिंकताही सर्वाधिक विकेट्स, अनलकी गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराहचाही समावेश

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) चा १९ वा हंगाम येत्या २८ मार्चपासून सुरु होत आहे. २०२६च्या या हंगामात पहिलाच सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध सनरायझर्स हैद्राबाद यांच्यात एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. हा हंगाम सुरु होण्याआधी पर्पल कॅप न जिंकणारे गोलंदाज कोणते हे जाणून घेऊ. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूला पर्पल कॅप दिली आहे, मात्र असे काही गोलंदाज आहे. जे या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या पाचमध्ये आहेत, मात्र एकदाही पर्पल कॅप मिळाली नाही.

सुनील नरेन हा यादीत सर्वात पहिल्या स्थानावर आहे. त्याने १८९ आयपीएल सामने खेळले असून १९२ विकेट्स घेतल्या आहेत. तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. पियुष चावलाने २००८-२०२४ दरम्यान १९२ सामने खेळले असून त्यामध्ये १९२ विकेट्स घेतल्या आहेत.

पर्पल कॅप न मिळालेल्या यादीत भारताचा दिग्गज स्पिनर आर अश्विनही आहे. त्याने २२१ आयपीएल सामने खेळले असून त्यामध्ये १८७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने मागील वर्षीच आयपीएलमधून निवृत्ती घेतली. त्यामध्ये तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला. चौथ्या क्रमांकावर जसप्रीत बुमराह आहे. तो २०१३ पासून आयपीएलमध्ये खेळत असून त्याला एकदाही पर्पल कॅप मिळाली नाही. त्याने १४५ सामन्यांमध्ये १८३ विकेट्स घेतल्या आहेत. तो पहिल्यापासूनच मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे.

अमित मिश्रा भारताचा माजी फिरकीपटू. तो पण यादीत आहे. त्याने आयपीएलमध्ये १६२ सामने खेळताना १७४ विकेट्स घेतल्या आहेत. तो दिल्ली, हैद्राबाद आणि लखनऊ या फ्रॅंचायजीकडून खेळला. त्याने २०२४ मध्ये लखनऊकडून कारकिर्दीतील शेवटचा आयपीएल सामना खेळला होता.

या यादीमध्ये अनुभवी अष्टपैलू रविंद्र जडेजादेखील आहे. त्याने २५४ सामन्यांत १७० विकेट्स घेण्याची कामगिरी केली, मात्र एकदाही पर्पल कॅप जिंकली नाही. तो २०२६ चा हंगाम राजस्थान रॉयल्सकडून खेळणार आहे. राशिद खानही या यादीत आहे. त्याने १३६ सामन्यात १५८ विकेट्स घेतल्या आहेत आणि आतापर्यंत एकदाही पर्पल कॅप जिंकली नाही. तो गुजरात टायटन्सकडून खेळतो.

‘पर्पल कॅप’ विजेते
(प्रत्येक आयपीएल हंगामाचे)
२००८, सोहेल तन्वीर (२२)
2009 आरपी सिंग (23)
2010 प्रज्ञान ओझा (21)
2011 लसिथ मलिंगा (28)
२०१२ मोर्ने मॉर्केल (२५)
2013 ड्वेन ब्राव्हो (32)
2014 मोहित शर्मा (23)
2015 ड्वेन ब्राव्हो (26)
२०१६ भुवनेश्वर कुमार (२३)
2017 भुवनेश्वर कुमार (26)
२०१८ अँड्र्यू टाय (२४)
2019 इम्रान ताहिर (26)
२०२० कागिसो रबाडा (३०)
२०२१ हर्षल पटेल (३२)
२०२२ युझवेंद्र चहल (२७)
२०२३ मोहम्मद शमी (२८)
२०२४ हर्षल पटेल (२४)
2025 प्रसिद्ध कृष्ण (25)

Comments are closed.