Top Marathi News Today Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहेत

मराठी ब्रेकिंग न्यूज अपडेट्स: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली आहेत. दरम्यान, पंतप्रधान मोदी गुरुवारी आंध्र प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीदरम्यान ते 13430 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. याशिवाय ते कर्नूलमधील सुपर जीएसटी-सुपर सेव्हिंग्ज कार्यक्रमातही सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आंध्र प्रदेश दौऱ्यावर असताना, पंतप्रधान मोदी श्रीशैलम येथील श्री भररामंबा मल्लिकार्जुन स्वामी वरला देवस्थानमला भेट देऊन आपल्या दौऱ्याची सुरुवात करतील. आंध्र प्रदेशात पोहोचल्यानंतर पंतप्रधान सकाळी श्रीशैलम येथील श्री भररामंबा मल्लिकार्जुन स्वामी वरला मंदिरात पूजा करतील. हे मंदिर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि ५२ शक्तीपीठांपैकी एक आहे. या मंदिराचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठ यांचे एकाच संकुलात सहअस्तित्व आहे, ज्यामुळे ते संपूर्ण देशातील अशा प्रकारचे एकमेव मंदिर बनले आहे.
Comments are closed.