अहिल्यानगरमध्ये नर्तिका दिपाली पाटीलने आयुष्य संपवलं, भाजप नेत्याला अटक, चित्रा वाघ म्हणाल्या,


Ahilyanagar Crime: जामखेड येथील साई लॉजमध्ये नर्तिका दिपाली गोकुळ पाटील (Deepali Patil) (वय 35, रा. कल्याण, सध्या जामखेड) हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी भाजपचा (BJP) माजी नगरसेवक संदीप सुरेश गायकवाड (Sandeep Gaikwad) याला जामखेड पोलिसांनी (Police) अटक केली आहे. लग्नासाठी जबरदस्तीचा दबाव आणल्यामुळे दिपालीने हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपाली पाटील जामखेडमधील तपनेश्वर भागात मैत्रिणींसोबत राहत होती. शुक्रवारी सकाळी ती “बाजारात जाते” असे सांगून घराबाहेर पडली. अनेक तास उलटल्यानंतरही ती परत न आल्याने मैत्रिणींनी शोधाशोध सुरू केली. चौकशीत रिक्षाचालकाने तिला साई लॉजवर सोडल्याचे सांगितले. सायंकाळी मैत्रिणी लॉजमध्ये पोहोचल्यावर खोली आतून बंद होती. लॉज कर्मचाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला असता दिपालीने गळफास घेतल्याचे आढळले. पोलिसांनी मृतदेह पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला.

Ahilyanagar Crime: भाजप नेत्याला अटक

या प्रकरणी दिपालीवर लग्नासाठी दबाव आणणाऱ्या संदीप गायकवाडविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. गायकवाड हा भाजपचा माजी नगरसेवक असून त्याचे नाव या प्रकरणात प्रमुखत्वाने समोर आले आहे.

Chitra Wagh: देवाभाऊ कोणालाही माफी देणार नाहीत

या प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मला या घटनेची माहिती नाही. कोणीही असेल पोलीस तपास करतील. देवाभाऊ कोणाला ही माफी देणार नाही. आमच्या पक्षाचे असले तरी सोडणार नाही,” अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे.

Rohit Pawar : रोहित पवारांचा इशारा

दरम्यान, घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. जामखेडमधील अवैध धंदे आणि गुन्हेगारी याबाबत कायमच आवाज उठवतोय परंतु या धंद्यांना कुणाचा आश्रय मिळतो हे आता लपून राहिलं नाही. अशातच जामखेडमध्ये नृत्यांगना दिपाली पाटील (35) यांनी एका लॉजमध्ये आत्महत्या केल्याची बातमी आली. आत्महत्या करण्यापूर्वी संबंधित महिलेसोबत कोण होतं? त्याचे काय संबंध आहेत? त्याला कोणत्या उच्चपदस्थांचा वरदहस्त आहे? आणि त्याच्या कुटुंबातील व्यक्तीने कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवली? याची सखोल चौकशी करण्यासाठी संबंधित लॉजवरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेऊन या गुन्ह्याची उकल करावी. यातून अनेकांचे काळे चेहरे उघड झाल्याशिवाय राहणार नाहीत. संबंधित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी हे प्रकरण दडपण्याचा कुणी प्रयत्न केला तर तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही, असे इशारां त्यांनी दिला आहे.

आणखी वाचा

Nagpur Crime News: लग्नाच्या वादातून प्रियकरावर चाकूने हल्ला; त्यानेच सगळं केल्याचा बनाव, मोबाईलही फॉर्मेट केला अन्…नागपुरातील त्या खुनात धक्कादायक खुलासे समोर

आणखी वाचा

Comments are closed.