Datta Dalvi joins Shiv Sena in the presence of Eknath Shinde


मुंबई : मुंबईचे माजी महापौर आणि उबाठाचे उपनेते दत्ता दळवी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आज (28 एप्रिल) उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाला मंत्री भरत गोगावले, खासदार संदिपान भुमरे, शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटावर निशाणावर साधला. महायुती सत्तेत आल्यानंतर सरकारने मुंबई स्वच्छ करण्याचे काम केले. ब्रिटीशांनंतर महायुती पहिल्यांदा मुंबईचे रस्ते धुतले गेले, मात्र त्याआधी काहीजणांनी मुंबईची तिजोरी साफ केली, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. (Datta Dalvi joins Shiv Sena in the presence of मराठी)

दत्ता दळवी यांच्यासह आज धारावी, विक्रोळी, कांजूर, भांडूप आणि मुलुंडमधील महिला विभाग अध्यक्ष, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख 500 हून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. या पक्ष प्रवेशाने विक्रोळीत उबाठा गटाला खिंडार पडले. त्याचबरोबर मुरबाडमधील उबाठा तालुका प्रमुख, उप तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, विधानसभा क्षेत्र संघटक, युवा सेना पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. जळगाव जिल्ह्यातील काँग्रेस, उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या जवळपास दोन हजार कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. सोलापूर येथील मंगळवेढा तालुक्यातील 18 सरपंचांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. छत्रपती संभाजी नगरमधून ओबीसी महासंघाचे 22 जिल्हाध्यक्ष, हिंदुस्थान चित्रपट कामगार सेना महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच पिंटो यांच्यासह असंख्य ख्रिस्ती बांधवांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला.

हेही वाचा – Pratap Sarnaik : एसटी महामंडळाची आर्थिक श्वेतपत्रिका काढा; परिवहन मंत्र्यांचे निर्देश

एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबई महापालिका काहीजण स्वत:ची जहागिरीदारी समजत होते. मात्र महायुतीचे सरकार आल्यानंतर मुंबईतील रखडलेले प्रकल्प सुरू केले. मुंबईकरांना हक्काची घरे, आरोग्य सुविधा देण्याचे काम सरकार करतेय. आतापर्यंत उबाठाचे 45 ते 50 नगरसेवक मूळ शिवसेनेत परतले आहेत. मुंबई पालिकेतील विविध पक्षांच्या जवळपास 70 विद्यमान नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

दरम्यान, शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मागील अडीच वर्षांपासून सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यासंदर्भात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, बाळासाहेबांचे विचार, धर्मवीर आनंद दिघेंचे विचार आणि विकास प्रकल्प पुढे नेण्याचे काम आपण करत आहोत. दिलेला शब्द पाळत आहोत. त्यामुळे लाखो कार्यकर्ते शिवसेनेत येत आहेत. विधानसभेत 80 जागा लढून 60 जागा जिंकलो, तर उबाठाला 100 लढून अवघ्या 20 जागा जिंकता आल्या. जनतेने खरी शिवसेना कोणाची यावर शिक्कामोर्तब केले आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांवर महायुतीचा भगवा डौलाने फडकवायचा आहे. परंतु काही जण लोक सोडून का जातात याचे आत्मपरिक्षण करण्याऐवजी त्यांच्यावर आरोप करता. त्यांना कचरा म्हणतात, मात्र एक माणूस बरोबर आणि लाखो चूक कसे असू शकते? असा प्रश्न उपस्थित करत एकनाथ शिंदे म्हणाले की, पहलगाममधील हल्ल्याचा आम्ही निषेध केला. पर्यटकांच्या पाठिशी शिवसेना आणि सरकार पूर्ण ताकदीशी आहेत. मात्र या घटनेवर राजकारण कुणी करू नये, अशी विनंती देखील एकनाथ शिंदे यांनी केली.

हेही वाचा – Narhari zirval : केंद्राची जलजीवन योजना फेल ; केंद्राच्या योजनेवर मंत्री झिरवाळांचा आक्षेप



Source link

Comments are closed.