Eknath Shinde lashes out at Ganesh Naik’s forest department official over construction of Gaimukh road on Ghodbunder Road in Thane
राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील सुप्त संघर्ष आणखीनच दिसून येत आहे. अशातच एकनाथ शिंदे घोडबंदर रोडवरील गायमुख घाटातील रस्त्यावरून वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे असलेल्या वनखात्यावर चांगलेच भडकल्याचे दिसून येत आहे.
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक या ठाणे जिल्ह्यातील दोन नेत्यांचा सुप्त संघर्ष आता लपून राहिलेला नाही. एकमेकांवर कुरघोडी करण्याची दोन्ही नेते एकही संधी सोडत नाहीत. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यातील सुप्त संघर्ष आणखीनच दिसून येत आहे. अशातच एकनाथ शिंदे घोडबंदर रोडवरील गायमुख घाटातील रस्त्यावरून वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे असलेल्या वनखात्यावर चांगलेच भडकल्याचे दिसून येत आहे. (मराठी lashes out at Ganesh Naik’s forest department official over construction of Gaimukh road on Ghodbunder Road in Thane)
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख घाटात काही दिवसांपूर्वी रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. मात्र हा रस्ता डांबराचा करण्यात आला आहे. त्यामुळे हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा न करता डांबराचा का केला? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी बैठकीत विचारला. यावर सार्वजनिक विभागाने सांगितले की, वन परिसरात काँक्रीटचा रस्ता बांधण्याची परवानगी वन खातं देत नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाचं उत्तर ऐकल्यावर एकनाथ शिंदे संतापले. त्यांनी तत्काळ वनखात्याच्या अधिकाऱ्यांना फोन केला. त्यावेळी वन खात्याने सांगितलं की, ही जमीन वनखात्याची असल्याने परवानगी देता येणार नाही. वन खात्याचं उत्तर ऐकून शिंदे चांगलेच भडकले.
हेही वाचा – Devendra Fadnavis : बाल वाङ्मय वाचण्याचं माझं वय नाही; राऊतांच्या पुस्तकावर फडणवीसांची खोचक टीका
एकनाथ शिंदे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता लोकांच्या डोकेदुखीचं कारण ठरला आहे. त्यामुळे या रस्त्याचं डांबरीकरण सोडून त्याचं काँक्रीटीकरण का करण्यात आलं नाही? लोकांच्या जिवापेक्षा तुम्ही मोठे नाही. तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ताबडतोब सांगा आणि घोडबंदर रस्त्यावर सिमेंट काँक्रीटचा रस्ता बांधण्यास परवानगी द्या. जर तिथे अपघात झाल्यास तुम्हाला जबाबदार धरलं जाईल. तुमच्यावर गुन्हे दाखल करणार नाही या गैरसमजात राहू नका, अशा शब्दांत शिंदेंनी वन अधिकाऱ्यांना अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं.
हेही वाचा – Congress : पालिकेत माविआचे काय होणार? उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी दिली ही माहिती
Comments are closed.