Nana patole slams mahayuti govt over cji protocol breach in marathi


सरन्यायाधीश यावर गमतीने बोलले असले तरी, तो प्रशासनाला इशारा आहे, जो सरकारला कळला नसेल. सरन्यायाधीश गवई हे आंबेडकरी आहेत म्हणून त्यांच्या महाराष्ट्रात अपमान केला आहे का? की मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले होते, हे समजले पाहिजे.

Nana Patole : मुंबई : महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई सरन्यायाधीश झाल्यांनतर संपूर्ण महाराष्ट्राला त्यांचा अभिमान आहे. पण आपल्याच सुपुत्राचा अपमान राज्यातील भाजपा युती सरकार तसेच अधिकाऱ्यांनी केला आहे. सरन्याधीशांसाठी असलेला प्रोटोकॉल न पाळून सरकारने त्यांचा अपमान केला आहे. हे देश आणि राज्याला सहन न होणारे आहे. सरन्यायाधीशांचा प्रोटोकॉल न पाळून अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकार काय कारवाई करणार आहे?, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांनी विचारला आहे. (nana patole slams mahayuti govt over cji protocol breach)

नाना पटोले म्हणाले की, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभेचे अध्यक्ष सरन्यायाधीश, यांचा एक विशेष प्रोटोकॉल असतो. त्यांच्या दौऱ्याची माहिती आधीच संबंधितांना दिलेली असते. पण आम्हाला माहिती नव्हती असे हे अधिकारी सांगत आहेत, हे पटणारे नाही. सरन्यायाधीशांचा प्रोटोकॉल न पाळून भाजपा युती सरकारने महाराष्ट्राची अब्रू वेशीवर टांगली असल्याचा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा – Rahul Gandhi : चुकीच्या पद्धतीने माहिती देऊ नका, परराष्ट्र मंत्रालयाने राहुल गांधींचे आरोप फेटाळले

सरन्यायाधीश यावर गमतीने बोलले असले तरी, तो प्रशासनाला इशारा आहे, जो सरकारला कळला नसेल. सरन्यायाधीश गवई हे आंबेडकरी आहेत म्हणून त्यांच्या महाराष्ट्रात अपमान केला आहे का? की मुख्यमंत्र्यांनी तसे आदेश दिले होते, हे समजले पाहिजे. शिव, शाहू, फुले आंबेकरांच्या राज्यातून एक आंबेडकरी विचाराचा व्यक्ती सरन्यायाधीश झाला त्याचा आनंद आहे. विशेष म्हणजे सरकारमध्ये अनुभवी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यांनाही याचे गांभीर्य नाही का? असा सवालही नाना पटोले यांनी केला आहे.

हेही वाचा – Vijay Wadettiwar : साधा प्रोटोकॉल पाळला जात नाही, ही चूक कोणाची? वडेट्टीवारांचा सवाल

फुले चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी

राज्य सरकार सर्वधर्म समभाव मानत असेल तर महान समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जीवनावरील फुले चित्रपट राज्यात टॅक्स फ्री करावा अशी मागणीही नाना पटोले यांनी केली. या आधी सरकारने राज्यात अनेक चित्रपट टॅक्स फ्री केले आहेत पण फुले यांच्या जीवनावरील चित्रपटाबाबत वेगळी भूमिका का ? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला.



Source link

Comments are closed.