Prajakta Mali appeal to Karuna Munde PPK
भाजपा आमदार सुरेश धस यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मोठे रान उठले आहे. याबाबत आता प्राजक्ता माळी हिने पत्रकार परिषद घेतली. पण या पत्रकार परिषदेतून तिने करुणा मुंडेंनाही महत्त्वाचे आवाहन केेले आहे.
मुंबई : भाजपा आमदार सुरेश धस यांनी मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर मोठे रान उठले आहे. याबाबत प्राजक्ताने पत्रकार परिषद आमदार धस यांना खडेबोल सुनावले. तर ज्याप्रमाणे धस यांनी जाहीरपणे विधान केले, त्याचप्रमाणे जाहीरपणे त्यांनी माफी मागावी, अशी मागणी प्राजक्ता माळीने पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली. परंतु, धस यांच्या आधी करुणा मुंडे (मंत्री धनंजय मुंडेंच्या पत्नी) यांनी सुद्धा प्राजक्ता माळी हिचे नाव मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत जोडले होते. परंतु, गेल्या दीड महिन्यांपासून शांत असलेल्या प्राजक्ताने या पत्रकार परिषदेत त्याबाबतही प्रतिक्रिया दिली आहे. तर करुणा मुंडे यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. (Prajakta Mali appeal to Karuna Munde)
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आज, शनिवारी (ता. 28 डिसेंबर) पत्रकार परिषद घेत करुणा मुंडे यांना आवाहन करत म्हटले की, मी करुणा ताईंनाही विनंती करू इच्छिते की तुम्ही सुद्धा महिला आहात. महिलांना होणारा त्रास तुम्ही समजू शकता. या पुरुष प्रधान संस्कृतीत महिलाच महिलांच्या पाठी नाही राहिल्या तर कसे होणार. माझ्याबाबतची जी माहिती तुम्हाला मिळाली आहे, ती अत्यंत चुकीची माहिती आहे. तुमचा स्त्रोत चुकीचा आहे. कोणत्याही गोष्टीची खातर जमा केल्याशिवाय करुणा ताई तुम्ही असे करणार नाही, अशी विनंती करते, असे प्राजक्ता माळी हिने यावेळी म्हटले. तर ज्यावेळी करुणा मुंडे यांनी प्राजक्ता माळी हिचे धनंजय मुंडे यांच्याशी नाव जोडले होते, तेव्हाच त्यांना नोटीस पाठवण्यात आल्याचे प्राजक्ताने सांगितले.
– Advertisement –
हेही वाचा… Prajakta Mali : महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना हे शोभत नाही, संतापलेल्या प्राजक्ताने सुनावले खडेबोल
प्राजक्ताने प्रसार माध्यमांना फटकारले…
या पत्रकार परिषदेतून प्राजक्ता माळी हिने प्रसार माध्यमांना आणि युट्यूब चॅनल्सलाही फटकारले आहे. ती याबाबत म्हणाली की, प्रसार माध्यमे असो किंवा युट्यूब चॅनल असो यावरती सुद्धा दोन वाक्य घेऊन हजारो व्हिडीओ बनवले जात आहेत. त्यामुळे किमान त्यांनी तरी कोणतेही पुरावे नसताना अशा प्रकारचे व्हिडीओ बनवू. एका महिलेचे चारित्र्य काही सेकंदांच्या व्हिडीओमुळे डागाळू शकते. त्यामुळे या मला हा नियम आणायचा आहे की, प्रसार माध्यमांमध्ये जे काही न्यूज होतात, त्याला पुरावा पुराव्यांची जोड नसेल तर तुम्ही ते करू नका. आणि जर केले आणि त्यात काही खोटं आढळले तर त्यावर कायदेशीर कारवाई होईल, अशा पद्धतीचा नियम आला पाहिजे आणि हेच माझे खरे उद्दिष्ट आहे, असे यावेळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने सांगितले आहे. तर याबाबतचे निवेदन देण्यासाठी प्राजक्ता माळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही प्रसार माध्यमांसमोर सांगितले.
– Advertisement –
Edited By Poonam Khadtale
Comments are closed.