आष्टा नगरपरिषद निवडणूक! मतदानाच्या आकडेवारीत तफावत, दोन हजार मतांची वाढ झाल्याचा आरोप
सांगली : काय करावे ते सुचेना. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी राज्यात काल मतदानाची प्रक्रिया पार पडली. अनेक ठिकाणी शांततेत मतदान झाले तर काही ठिकाणी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं, दरम्यान, सांगली जिलह्यातील आष्टा नगरपरिषदेमध्ये झालेल्या मतदानात आणि प्रशासनाने जाहीर केलेल्या मतदानात तफावत असल्याचा आरोप करण्यात आला होता. यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि आष्टा शहर विकास आघाडी शिवसेना यांच्या प्रतिनिधींनी स्ट्रॉंग रुम समोरच जमा होत गोंधळ केल्याचं पाहायला मिळाले होते.
झालेल्या मतदानात आणि प्रशासनाने जाहीर केलेल्या मतदानात तफावत असल्याचा आरोप, चौकशीची मागणी
काल झालेल्या आष्टा नगर परिषदे मधील झालेल्या मतदानात आणि प्रशासनाने जाहीर केलेल्या मतदानात तफावत असल्याचा आरोप करत शरद पवार राष्ट्रवादी आणि आष्टा शहर विकास आघाडी शिवसेना यांच्या प्रतिनिधी मतदारांनी स्ट्रॉंग रूम समोरच गोंधळ सुरु केला आहे. या प्रकारची चौकशी करावी अशी मागणी करत आष्टा नगरपरिषद मधील ईव्हीएम मशीन ठेवलेल्या विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉल समोर आष्टा मधील बहुसंख्य नागरिक जमा झाले आहेत. निवडणूक प्रशासनाने रात्री दिलेल्या आकडेवारीत आणि सकाळी ऑनलाईन जाहीर केलेल्या आकडेवारीत जवळपास दोन हजार मतांची वाढ असल्याचा आरोप करत हजारोच्या संख्येने आष्टा नगरीचे नागरिक राजकीय प्रतिनिधी आणि उमेदवार यांनी गर्दी केली आहे. यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात वादावादिही झाली. आता हे वाढीव मतदान कोणाचे? खरंच वाढीव मतदान झाले आहे का? निवडणुक आयोगाच्या आकडेवारीत टाईप मिस्टेक झाली आहे का? की खरंच मतदान वाढीव आहे असे अनेक प्रश्न सध्या आष्टा शहरांत चर्चीले जात आहेत.
मोठ्या संख्येने सर्व पक्षाचे लोकं स्ट्रॉग समोरील रस्त्यावर उभे
दरम्यान, वाढीव मतदान कोणाचे याबाबत आक्षेप करणाऱ्या नागरिक आणि पोलीस तसेच मतदान अधिकारी यांच्यात वादाचे प्रसंग होतं असून सध्या मोठ्या संख्येने सर्व पक्षाचे लोकं स्ट्रॉग समोरील रस्त्यावर उभे आहेत. याबाबत निवडणूक अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी आकडेवारी तपासली जात असल्याचे सांगितले आहे.
दरम्यान, काल राज्याच्या विविध भागात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या काळात काही ठिकाणी गोंधळ उडाल्याचे चित्र देखील पाहायला मिळाले. तसेच पोलीस, प्रशासन आणि नागरिक यांच्यात काही ठिकाणी बाचाबाची देखील झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. त्यामुळं राजकीय वातावरण गरम झाल्याचे दिसत आहे.
आणखी वाचा
Comments are closed.