Tanaji Sawant Shivsena leaders son missing first reaction in marathi
पुणे : शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचा पुत्र ऋषीराज सावंत हा बेपत्ता असल्याचे सोमवारी (10 फेब्रुवारी) समोर आले. त्यानंतर महाराष्ट्रातून अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. ऋषीराज सावंतचे अपहरण झाले की ते बेपत्ता झाले? यावर अनेक चर्चा सुरू होत्या. यावरून स्वतः माजी मंत्री तानाजी सावंत यांनी माहिती दिली आहे. त्यांनी या सर्व प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तालयाला भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “ऋषीराज हा नेहमी मला फोन करून जातो. पण, यावेळी जाताना त्याने मला कोणतीही माहिती न दिल्याने मी अस्वस्थ झालो आहे.” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. (Tanaji Sawant Shivsena leaders son missing first reaction)
हेही वाचा : Tanaji Sawant : तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण? पोलिसांना सांगितला घटनाक्रम
“बेपत्ता का अपहरण असे काही नाही. त्याच्यासोबत त्याचे दोन मित्रही आहेत. घराबाहेर पडताना तो मला सांगतो. कधी वाकडला जरी गेला तरीही मला सांगून जातो. दिवसातून त्याचे मला 15 वेळा फोन येतात. पण यावेळी त्याने स्वत:ची गाडी घेतली नाही आणि दुसऱ्या गाडीने गेला. फोन न करता मुलगा घरातून गेला होता. त्यामुळे आम्ही काळजी म्हणून तक्रार केली. त्याला सोडायला वाहनचालकही गेला होता, त्याने सांगितले की त्या तिघांना विमानतळावर सोडले, त्याच्यामुळेच आम्हाला समजले. त्याच्याशी संपर्क झाला नाही म्हणून मी अस्वस्थ झालो आहे. खासगी विमान आहे की साधे विमान? याबाबत आम्हाला अजून माहिती मिळालेली नाही,” अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली आहे.
नेमकं प्रकरण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंदाजे दुपारी 4 वाजता पोलिसांच्या कंट्रोल रूमला माहिती मिळाली की तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाले आहे. ही माहिती मिळाल्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. त्याची माहिती घेणे सुरू झाल्यानंतर पुण्यावरून विमानाने गेला आहे. त्यांचे विमान कोणत्या दिशेने आणि कुठे चालले? याची माहिती गोळा केली जात आहे. त्यांना परत आणण्यासाठी यंत्रणा काम करत आहे. याबद्दल सिंहगड रोड पोलीस ठाण्यात एक अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्या अनुषंगाने आता तपास सुरू असल्याचे सांगितले.
Comments are closed.