IND vs SA : दक्षिण आफ्रिका विरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय टीम निवडीत उलथापालथ! शमीसह 4 दिग्गजांना डावललं
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात होणाऱ्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात ऋषभ पंतचं (Rishbh Pant) पुनरागमन झालं आहे, तसेच काही तरुण आणि स्टार खेळाडूंनाही संधी मिळाली आहे. मात्र, मोहम्मद शमीला (Mohmmed Shami) पुन्हा एकदा संघात स्थान मिळालं नाही, जरी त्याने नुकत्याच फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. शमी व्यतिरिक्त आणखी तीन स्टार खेळाडूंना दुर्लक्ष करण्यात आलं आहे.
शमीने अलीकडेच रणजी ट्रॉफी 2025-26 मध्ये बंगालकडून शानदार कामगिरी केली. उत्तराखंडविरुद्ध पहिल्याच सामन्यात त्याने 7 बळी घेतले, तर गुजरातविरुद्ध 8 विकेट्स घेतल्या होत्या. इतकं दमदार प्रदर्शन करूनही त्याला भारतीय कसोटी संघात निवडलेलं नाही. शमीने भारतासाठी शेवटचा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये खेळला होता.
सुमारे आठ वर्षांनंतर करुण नायरने (Karun Nair) इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियामध्ये पुनरागमन केलं होतं. मात्र त्याची कामगिरी विशेष ठरली नाही आणि तो पुन्हा संघाबाहेर गेला.
त्याने रणजी ट्रॉफीत मात्र चांगली फलंदाजी केली आहे. त्याच्या शेवटच्या चार डावांमध्ये 8, 73, 174 आणि 233 धावा आहेत.
बऱ्याच काळापासून भारतीय कसोटी संघापासून दूर असलेल्या ईशान किशनलाही (Ishaan kishan) या मालिकेत स्थान मिळालं नाही.
त्याने रणजी ट्रॉफी 2025-26 मध्ये तमिळनाडूविरुद्धच्या सामन्यात 173 धावांची शानदार खेळी केली होती,
तरीसुद्धा निवडकर्त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.
रजत पाटीदारलाही (Rajat Patidar) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी संघात संधी मिळालेली नाही. त्याने रणजी ट्रॉफीत पंजाबविरुद्ध दुहेरी शतक ठोकलं होतं. त्याच्या अलीकडच्या पाच डावांकडे पाहिलं तर, 19, 28, नाबाद 205, 66 आणि 10 धावा अशी आकडेवारी आहे. आता त्याची भारतीय कसोटी संघात पुनरागमनाची शक्यता कमी दिसत आहे.
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ:- शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टिरक्षक), यशस्वी जयस्वाल , के. एल. राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप
Comments are closed.