विकास लवांडे शाईफेक प्रकरणात पोलिसांची पहिली मोठी कारवाई; संग्राम भंडारे, अक्षय कांचन यांच्यावर
Vikas Lawande Attack: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे (Vikas Lawande Attack) यांच्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. विकास लवांडे (Vikas Lawande Attack) यांच्या अंगावर शाईच्या बाटल्या ओतण्यात आल्या. यावेळी धमकीही देण्यात आल्याचे लवांडे यांनी सांगितले आहे. या शाईफेकीचा व्हिडीओ समोर आला असून तो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक करणारे संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांच्यासह दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर या दोघांनी शाई फेक केली होती. 1959 च्या शस्त्र कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाई फेक करण्याआधी पिस्तूल दाखवल्याचा विकास लवांडे यांचा आरोप आहे. तर या घटनेप्रकरणी पोलीस उपायुक्त सागर कवडे, यांनी सांगितलं की, विकास लवांडे यांच्यावर शाही फेकीसंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आज सकाळची घटना असून व्हिडिओ पाहून कारवाई सुरू करण्यात आली आहे. विकास लवांडे यांनी सुरक्षा मागितल्याचे आत्तापर्यंत माहिती नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर सविस्तर माहिती देण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
विकास लवांडे शैफेक: विकास लवांडे शाई फेकीचे पडसाद देवाच्या आळंदीत उमटले
आज सकाळी आळंदी म्हातोबा येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावरती तथाकथित संग्राम भंडारे याने शाईफेफ केली त्याच्या निषेधार्थ आज आळंदी देवाची येथे आळंदी शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार गटाचे अध्यक्ष विलासजी कुराडे ,आळंदी शहर काँग्रेसचे अध्यक्ष श्री संदीप नाईकरे ,श्री संजयजी वडगावकर ,अर्जुनजी मेदनकर योगीराज सातपुते, विश्वंभरजी शिंदे पितळी गणपती देवस्थानचे सुदीप जी गरुड व इतर आळंदीकर ग्रामस्थांनी आळंदी माधवराव येथे जमून संबंधित प्रकारचा जाहीर निषेध केला निषेध केला.
विकास लवांडे Shaifek : त्यांनी गाडी आडवी घातली, मला पकडून गाडीतून…
शाईफेक आणि हल्ल्याबाबत एबीपी माझाला प्रतिक्रिया देताना विकास लवांडे म्हणाले की, माझी आज प्रवचन सेवा होती. पुण्याजवळील हवेली तालुक्यात लोणी काळभोरच्या जवळ एका गावामध्ये, माझं आठ वाजता प्रवचन होतं, प्रवचन सेवा संपवून मी दहा वाजता बाहेर पडलो, मला रस्त्यात एकांतात तीन- चार गाड्या एकदम आल्या, त्यांनी गाडी आडवी घातली, मला पकडून गाडीतून खाली उतरवलं, त्यामध्ये संग्राम भंडारी हा व्यक्ती मी ओळखला, उरुळी कांचनमधील अक्षय कांचन नावाचा एक गोरक्षक ओळखायला आला बाकीचे सगळे अनोळखी गुंड प्रवृत्तीचे लोक होते, त्यांनी मला गाडीतून उतरवल्यानंतर धक्काबुक्की करत स्मशानभूमीच्या शेजारी नेलं, मला तिथे त्यांनी रिवॉल्वर दाखवली. आवाज करायचा नाही वगैरे सांगितलं. तुझा मी खात्मा करणार आहोत असेही ते बोलत होते, आमच्या गुरूला तू का बोललास. असंही ते मला बोलले त्यानंतर माझ्या अंगावर एकदम दोन-तीन जणांनी शाईने भरलेल्या बाटल्या ओतायला सुरूवात केली, मला धक्काबुक्की करत शिवीगाळ करत ते निघून गेले, आजूबाजूचे लोक जमायला लागल्यावर ते लोक पळून गेले, तुझा खात्मा करणार, सावध रहा असंही त्यांनी वक्तव्य केलं, असं विकास लवांडे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं.
तर वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने काही धर्मांध विचाराचे लोक आहेत, वर्ण वर्चस्ववादी लोक आहेत, जे वारकरी संप्रदायाचे नाहीत अशा लोकांना माझ्या भूमिकेने कदाचित ते अस्वस्थ होत असावे, त्याच्यातूनच संग्राम भंडारी यांनी संगमनेरमध्ये हैदोस घातला होता. त्यावेळी तो गुंड घेऊन आला होता, वारकरी संप्रदायातील घुसकरांच्या संदर्भात वक्तव्यामुळे तो आमच्या गुरूला असं का बोलला वगैरे बोलत होता, त्यामुळेच त्याने माझ्यावर हल्ला केला असावा, लोक तिथे जमायला लागले म्हणून मी वाचलो. माझा ड्रायव्हर सोबत होता त्याच्यामुळे मी वाचलो. नाहीतर आज माझा खात्मा झाला असता, असे विकास लवांडे यांनी म्हटले आहे. जे हल्लेखोर होते, त्यांची आणि माझी काही ओळख नाही. मी त्यांना ओळखत नाही. मी आत्ता लोणी काळभोर पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यासाठी आलो आहे, पोलीस माझी फिर्याद घेत आहेत, मी पोलीस स्टेशन मध्ये बसून आहे, जोपर्यंत त्या सर्वांना अटक होत नाही जे काही 15 जण होते, तीन-चार गाड्या होत्या, तोपर्यंत मी इथून उठणार नाही, माझा सत्याग्रह आहे, त्यांना अटक होईपर्यंत सुरू राहील असेही पुढे विकास लवांडे यांनी म्हटले.
आणखी वाचा
Comments are closed.