टोरेस फसवणूक प्रकरण; युक्रेनियन सीईओला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

टोरेस गुंतवणूक फसवणूक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या युक्रेनियन अभिनेता आणि सीईओला मुंबई सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली. अरमेन अटाईन असे त्या युक्रेनियन अभिनेत्याचे नाव असून त्याला गेल्या आठवडय़ात मालाड मालवणी येथून अटक करण्यात आली होती तर कंपनीचा सीईओ तौसिफ रियाज याला लोणावळा येथून अटक करण्यात आली होती.

टोरेस ज्वेलरी ब्रँड चालवणाऱ्या प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित कंपनीने लाखो नागरिकांची कोटयवधींची फसवणूक केली असून याप्रकरणी 10 हजार 848 लोकांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे. यातील आरोपी अरमेन आणि तौसिफ यांची कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज सत्र न्यायालयात हजर करण्यात आले.

Comments are closed.